गर्लफ्रेंडवर राग काढण्याची चुक तुम्ही कधीही करु नका... ती तुम्हाला अशी महागात पडू शकते

हे प्रकरण अमेरिकेतील डलास शहरातील आहे, जिथे एका मुलाचे त्याच्या प्रेयसीसोबत भांडण करणं खूपच महागात पडलं.

Updated: Jun 13, 2022, 05:32 PM IST
गर्लफ्रेंडवर राग काढण्याची चुक तुम्ही कधीही करु नका... ती तुम्हाला अशी महागात पडू शकते title=

मुंबई : हे प्रकरण अमेरिकेतील डलास शहरातील आहे, जिथे एका मुलाचे त्याच्या प्रेयसीसोबत भांडण करणं खूपच महागात पडलं. त्याच्यासोबत गर्लफ्रेंडशी भांडण केल्यानंतर असं काही घडलं की, या रागात आणि मारामारीत त्या माणसाने असे काही केले, ज्याची त्याने स्वतः कल्पनाही केली नसेल. वास्तविक, ब्रायन हर्नांडेझ या २१ वर्षीय तरुणाने आपल्या मैत्रिणीसोबत भांडण झाल्यानंतर एका संग्रहालयात घुसून तोडफोड सुरू केली. 

यादरम्यान संग्रहालयात ठेवलेली 5 मिलियन डॉलर म्हणजेच, 40 कोटी रुपयांची प्राचीन ग्रीक कलाकृती त्याच्याकडून तोडण्यात आली.

स्वत: पोलिसांना फोन करून माहिती दिली

तोडफोडीची वेगळी पण आश्‍चर्यकारक गोष्ट अशी की, त्या व्यक्तीने स्वतः पोलिसांना फोन करून सांगितले की, त्याच्या मैत्रिणीशी भांडण झाल्यामुळे त्याने ही अमूल्य प्राचीन वास्तू नष्ट केली. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, ब्रायनने संग्रहालयात घुसून किमान तीन प्राचीन ग्रीक कलाकृती नष्ट केल्या, ज्यांची किंमत अंदाजे 40 कोटी रुपये आहे.

या कलाकृती सुमारे 2 हजार 500 वर्षे जुन्या होत्या. ही घटना बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली, त्यावेळी ब्रायनने खुर्चीच्या साह्याने संग्रहालयाचा दरवाजा तोडून संग्रहालयात प्रवेश केला आणि त्यानंतर त्याने संग्रहालयात घुसून तोडफोड सुरू केली.

ब्रायन सीसीटीव्हीमध्ये कलाकृती तोडताना दिसला

पोलिसांचे म्हणणे आहे की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये ब्रायन स्टूलमधून प्राचीन कलाकृती तोडताना दिसत आहे. ब्रायनने ज्या वस्तू नष्ट केल्या त्या दुर्मिळ पुरातन वस्तू असून त्या खूप मौल्यवान असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ज्यासाठी ब्रायनला अटक करण्यात आली असून त्याने अधिकाऱ्यांसमोर आपला गुन्हा कबूलही केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, जेव्हा संग्रहालयातील रक्षकांनी ब्रायनला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि विचारले की तो येथे काय करत आहे, तेव्हा त्याने सांगितले की तो त्याच्या मैत्रिणीमुळे वेडा झाला आहे, म्हणून तो त्याची मालमत्ता नष्ट करत आहे.