अमेरिकेत भीषण वादळात 50 लोकांचा मृत्यू, अनेक लोकं जखमी झाल्याची माहिती

अमेरिकेत आलेल्या भीषण वादळात ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. वादळामुळे अॅमेझॉनच्या गोदामाचे छत कोसळल्याने काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे.

Updated: Dec 11, 2021, 07:04 PM IST
अमेरिकेत भीषण वादळात 50 लोकांचा मृत्यू, अनेक लोकं जखमी झाल्याची माहिती title=

वॉशिंग्टन : अमेरिकेत आलेल्या भीषण वादळात 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आर्कान्सामधील नर्सिंग होम आणि दक्षिण इलिनॉयमधील अॅमेझॉन वेअरहाऊसला शुक्रवारी रात्री वादळाचा तडाखा बसला, त्यामुळे एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. याशिवाय टेनेसीमध्ये खराब हवामानामुळे तीन जणांचा मृत्यू झाला.

मिसूरी येथे 1 ठार

वादळामुळे अॅमेझॉनच्या गोदामाचे छत कोसळल्याने काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे. मिसुरीमध्ये भीषण चक्रीवादळामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा आणि शनिवारी सकाळी मध्यपश्चिम आणि दक्षिणेकडील काही भागातही वादळाने दणका दिला.

टेनेसीमध्ये, वायव्येकडील लेक काउंटीमध्ये वादळामुळे दोन मृत्यूची नोंद झाली आहे, तर शेजारच्या ओबियन काउंटीमध्ये एक मृत्यू झाल्याचे टेनेसी आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीचे प्रवक्ते डीन फ्लेनर यांनी सांगितले. फ्लेनर म्हणाले की, टेनेसीच्या आरोग्य विभागाने मृत्यूची पुष्टी केली आहे.

बचाव कार्य सुरु

क्रेगहेड काउंटीचे न्यायाधीश मार्विन डे यांनी CAT-TV ला सांगितले की, उत्तर अर्कान्सासच्या मोनेट मॅनोर भागात वादळ आल्यानंतर वादळात इतर पाच लोक जखमी झाले आणि 20 लोक अडकले. टीव्ही चॅनेलने वृत्त दिले की टॉमनमधील आपत्ती बचावकर्ते आणि जोन्सबोरोचे पोलीस आणि अग्निशामक मदतीसाठी या भागात पोहोचले.

इमारत कोसळून 100 हून अधिक लोक अडकल्याची भीती

सेंट लुईसमधील टीव्ही चॅनेलवरील फुटेजमध्ये एडवर्ड्सविले, इलिनॉयजवळील अॅमेझॉन सेंटरमध्ये अनेक आपत्कालीन वाहने दिसली. किती लोक जखमी झाले याची अद्याप पुष्टी झालेली नाही, परंतु कॉलिन्सविले, इलिनॉयच्या आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीने फेसबुकवर "मास कॅज्युअल्टी" असे वर्णन केले आहे. एका अधिकाऱ्याने मीडियाला सांगितले की, इमारत कोसळली तेव्हा रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणारे 100 हून अधिक लोक अडकल्याची भीती होती. काही जखमींना हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्यात आले.

वारे वेगाने वाहत होते

सेंट लुईसमधून जोरदार वादळ वाहत असताना इमारत कोसळली. मिसूरीमधील सेंट चार्ल्स आणि सेंट लुईस काउंटीच्या काही भागांमध्ये 70 मैल प्रति तास वेगाने वारे वाहत होते. सेंट चार्ल्स काउंटीमधील तीन लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि ऑगस्टा, मिसूरी जवळील अनेक घरे वादळामुळे उद्ध्वस्त झाली. दरम्यान, अॅमेझॉनचे प्रवक्ते रिचर्ड रोचा यांनी शुक्रवारी रात्री एका लेखी निवेदनात सांगितले की, आमचे कर्मचारी आणि लोकांची सुरक्षा ही सध्या आमची पहिली प्राथमिकता आहे. ते म्हणाले की आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. उर्वरित माहिती लवकरच शेअर करू.