मुंबई : जगभर इतक्या प्रथा आहेत, ज्यांपैकी आपल्याला माहित देखील नाहीय. कधीकधी आपल्या समोर या संदर्भात अशा काही प्रथा समोर येतात. ज्या आपल्याला थक्कं करणाऱ्या असतात. या प्रथांमगील कारण देखील तितकीच आश्चर्यकारक असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका परंपरेबद्दल सांगणार आहोत, जी ऐकून तुम्हाला तुमच्या कानावर विश्वास बसणार नाही. वास्तविक जगात असा एक समुदाय आहे, जिथे मुलीचा नवराच तिचा बाप असतो. हो तुम्ही बरोबर ऐकले. इथे आई आणि मुलीला एकच नवरा आहे.
एका रिपोर्टनुसार, हा समुदाय बांगलादेशच्या आग्नेयेकडील माधोपूर जंगलात राहतो. हा समाज आदिवासी अंतर्गत येतो आणि त्याचे नाव 'मंडी' आहे. यावेळी मंडी समाजातील बहुतांश लोकांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला आहे. येथे महिला या कुटुंब प्रमुख असतात आणि त्याच आपल्या घरावर राज्य करतात.
या दैनिक भास्करमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका जुन्या बातमीनुसार, या समाजाशी संबंधित एक महिला म्हणते, "आपल्या प्रियजनांसाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात. कारण आपल्याला आपल्या प्रियजनांची संपत्ती वाचवायची आहे. ज्यामुळे मुलीचे लग्न वडिलांशी केले जाते."
मंडी समाजातील लोकांमध्ये ही परंपरा शतकानुशतके सुरू आहे. वडिलांसोबत लग्नाच्या संबंधात लोक काहीही म्हणू देत, परंतु अनेक मुलींना या वाईट प्रथेपासून दूर पळायचे आहे.
या प्रथेमुळे अनेक मुलींच्या आयुष्यावर चुकीचा परिणाम होतो, म्हणजे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. मात्र, आता हळुहळू ही दुष्ट प्रथा नष्ट होत आहे, कारण नवीन युगातील मुली हा विधी योग्य मानत नाहीत आणि त्या याला विरोध करत आहेत.