दोन तुकड्यामध्ये सायकलचे चाक, पण तरीही रस्त्यावर धावते सुपरफास्ट... व्हिडीओने उडवली सर्वांची झोप

ध्या जी सायकल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तिचं डिझाइन पाहून तुम्ही थक्कं व्हालय कारण या सायकल सारखं डिझाइन तुम्ही आजपर्यंत कधी पाहिलं नसेल.

Updated: Jul 8, 2022, 07:06 PM IST
दोन तुकड्यामध्ये सायकलचे चाक, पण तरीही रस्त्यावर धावते सुपरफास्ट... व्हिडीओने उडवली सर्वांची झोप title=

मुंबई : मुलं जेव्हा सायकल चालवायला शिकतात तेव्हा त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सायकल चालवायला आवडते. यामध्ये काही सायकलला गियर असतात तर काही सायकलची बॉडी स्टायलीस्ट असते. तर काही सायकल या ऑफरोडिंगसाठी बनवल्या जातात. लहानपणापासून आपण नेहमीच अशा वेगवेगळ्या सायकल पाहत आलो आहो. यामध्ये दोन व्यक्तींना एकाच वेळी चालवता येणाऱ्या सायकलचा देखील समावेश आहे.

परंतु सध्या जी सायकल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तिचं डिझाइन पाहून तुम्ही थक्कं व्हालय कारण या सायकल सारखं डिझाइन तुम्ही आजपर्यंत कधी पाहिलं नसेल. होय कारण या सायकलचं चाक हे दोन भागात विभागले गेलेलं आहे आणि तरी देखील ही सायकल नॉर्मल सायकल सारखी चालते.

तुम्हाला आता प्रश्न पडला असेल ना की, ही अशी विचित्र दिसणारी सायकल का बनवली गेली असावी किंवा ती कशी चालते? मग एकदा हा व्हिडीओ पाहा तुम्हाला सगळं काही लक्षात येईल.

एका इंजिनिअरने एका विचित्र पद्धतीने सायकलची रचना केली आहे, ज्यामध्ये सायकलचे मागील चाक दोन भागात विभागलेले दिसत आहे. मात्र, असे असूनही तो रस्त्यावरून सुसाट वेगाने ही सायकल चालवू शकतो.

हा इंजिनिअर यूट्यूबर देखील आहे, ज्यामुळे त्याने यासंदर्भात एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने एक अद्वितीय आणि पूर्ण कार्यक्षम अशी सायकल तयार केली आहे जी सामान्य पद्धतीने रस्त्यावर धावते. 

यूट्यूबवर 'द क्यू' नावाचे चॅनल चालवणारे सर्गेई गॉर्डिएव्ह हे त्यांच्या आउट ऑफ द बॉक्स क्रिएशनसाठी प्रसिद्ध आहेत.

त्याने सायकलच्या मागील चाकाचे दोन भाग करून ती सायकल बनवली. त्यानंतर या संबंधीत व्हिडीओ शेअर करताना व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'फक्त एक सामान्य बाइकचे गणित: 0.5 x 2 = 1 चाक.' व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्याने कसं हुशारीने कस्टम-मेड बाइक बनवली आहे.

त्याने प्रथम चाकाचे दोन भाग कापून घेतला आणि नंतर त्यात कडक रबर बसवला. यानंतर, खूप प्रयत्नांनंतर, नवीन डिझाइन केलेली सायकल तयार केली, जी सर्वात वेगळी आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही या व्यक्तीचे चाहते व्हाल. आतापर्यंत हा व्हिडीओ सुमारे 7 कोटी वेळा पाहिला गेला आहे.