अमेरिकन ट्रांसलेटरला उडत्या हेलिकॉप्टरला लटकवलं... तालिबान्यांच्या क्रुरतेचा भयानक व्हिडीओ

तालिबान अफगाणिस्तानात जवळ-जवळ 20 वर्षांनंतर परतल आले. परंतु आताचा तालिबान हा बदलेला तालिबान आहे असा दावा स्वत: तालिबान्यांनी केला.

Updated: Aug 31, 2021, 06:56 PM IST
अमेरिकन ट्रांसलेटरला उडत्या हेलिकॉप्टरला लटकवलं... तालिबान्यांच्या क्रुरतेचा भयानक व्हिडीओ title=

कंधार : तालिबान अफगाणिस्तानात जवळ-जवळ 20 वर्षांनंतर परतल आले. परंतु आताचा तालिबान हा बदलेला तालिबान आहे असा दावा स्वत: तालिबान्यांनी केला. त्याने सुरूवातीला जगाला आपला चांगूलपणा दाखवून देण्याचा प्रयत्व केला. परंतु त्यांना हे सोंग जास्त दिवस टिकवता आले नाही आणि त्यांच खरं रुप अखेर समोर आलंच. आता तालिबान्यांचं अत्याचारी आणि भयानक रुप समोर आलं आहे. जे पाहिल्यावर तुमच्या अंगावट काटा उभा राहिल.

तालिबानच्या क्रूरतेचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियातून समोर आला आहे, ज्यात एक व्यक्ती चॉपरला म्हणजेच हॅलिकॉप्टरला लटकलेला दिसत आहे.

अफगाणिस्तानमधील कंधारमध्ये तालिबान्यांनी क्रूरतेची मर्यादा ओलांडली आणि अमेरिकन अनुवादक (American Translator) उडत्या हेलिकॉप्टरवर फाशी दिली. अहवालांनुसार, ज्या हेलिकॉप्टरमधून व्यक्तीला फाशी देण्यात आली ते UH-60 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर होते. अमेरिकेने हे हेलिकॉप्टर अफगाण सैन्याला दिले होते आणि त्याच हेलिकॉप्टरला अमेरिकेच्या नागरीकाला फाशी देण्यात आली.

तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद (Zabiullah Mujahid)  यांनी अमेरिकन सैन्य माघारी जात असल्याने त्याचा संबंध अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्याशी जोडला आणि सांगितले की, आज देश पूर्णपणे स्वतंत्र झाला आहे. पण यानंतर जेव्हा काबूल विमानतळ तालिबान्यांनी पूर्णपणे काबीज केले, तेव्हा तालिबानी दहशतवाद्यांनी भीतीदायक उत्सव साजरा केला.

या दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार केला आणि आकाशात अनेक रॉकेट देखील सोडले. हे दृष्य खरोखरच खूप भयानक होतं.

तालिबानच्या या गोळीबाराने काबूलचे स्थानिक लोक भयभीत झाले होते. तालिबानने त्यांना सांगितले की, हा हल्ला नव्हता, पण अमेरिका देशातून गेल्यानंतर उत्सवाच्या रुपात गोळीबार केला जात होता.

तालिबानला अमेरिकेबरोबर राजनैतिक संबंध हवे आहेत: प्रवक्ते

तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद (Zabiullah Mujahid) यांनी काबूल विमानतळावर पत्रकार परिषद घेतली आणि अमेरिकेबरोबरच्या राजनैतिक संबंधांबद्दलही बोलले.

प्रवक्ते म्हणाले की, अमेरिकन सैन्याचा माघार हा आमच्या सर्वांचा विजय आहे. परंतु तालिबानला अमेरिकेबरोबर चांगले राजनैतिक संबंध हवे आहेत.