नवी दिल्ली : Coronavirus कोरोना व्हायरसनं साऱ्या विश्वाला विळखा घालण्यात सुरुवात केली आणि दर दिवसाआड या विश्वातील प्रत्येक व्यक्ती एका वेगळ्याच दहशतीखाली जगू लागलं. साऱ्या जगाला एका दहशतीच्या गर्द छायेत लोटणाऱ्या या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं आहे. पण, तरीही कोरोना मात्र काही नमण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे.
17 नोव्हेंबर 2019ला china चीनमधील hubei हुबेई प्रांतातील एका 55 वर्षीय व्यक्तीला पहिल्यांनादाच कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं. त्यानंतर 8 डिसेंबरला चीनच्याच wuhan वुहानमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला. पण, तोवर मात्र या विषाणूची ओळख पटली नव्हती. पुढं जानेवारी 3, 2020ला चीननं या निनावी व्हायरसची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला दिली. चीननंच या विषाणूला novel coronavirus असं नाव दिलं. पुढं नेमकं काय आणि कसं घडत गेलं हे आपण सारे जाणतोच.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल. पण, अवघ्या एका चमचाभर कोरोनानं ही अवस्था केली आहे. एका अहवानानुसार कोरोनाचं प्रमाण अवघं 8 मिली लीटर म्हणजे एक चमचा इतकंच आहे. अशा या व्हायरसनं जगातील तब्बल 5 कोटी 60 लाखांहून अधिकजणांना प्रभावित केलं आहे.
Australia तील गणितज्ज्ञ Matt Parker यांनी एका सूत्राच्या आधारे हा अंदाज बांधला आहे. कोरोनाच्या किती मात्रेनं लोक प्रभावित होतात याचा अभ्यास त्यांनी सर्वप्रथम केला. ज्यानंतर त्यांनी जगभरात दर दिवशी कमीत कमी 3 लाख लोकांना लागण होण्याचा आकडा समोर धरला.
कोरोना व्हायरसचा आकार इतका लहान असतो की, तुम्ही त्याला सहजासहजी पाहू शकत नाही. मानवाच्या कोशिकांचा आकार जवळपास 100 मायक्रोमीटर इतका असतो. कोरोना व्हायरसच्या आकाराहून हा आकार 10 लाख पटींनी जास्त असतो.
Matt Parker यांच्यानुसार कोरोना हा एका संगणकीय कोडप्रमाणं आहे. जो मानवी कोशिकांमध्ये गोंधळ निर्माण करतो.