मुंबई : मुंबईत बोटावर मोजण्यासारखे टॉपचे वडापाव आहेत, यात पहिल्या १० वडापावांमध्ये समावेश करता येईल असा एक वडापाव म्हणजे पार्लेश्वर वडापाव. पार्लेश्वर वडापावची चव चाखण्यासाठी येथे नेहमीच ग्राहकांची गर्दी असते, गर्दीत वडापाव मिळवून तो खाण्यात खरी 'टेस्ट' असते.
वडापाव म्हणजे नुसता बटाटा वडा, पावासोबत कोरड्या आणि तिखट ओल्या चटणीने ठेवला, आणि ग्राहकाच्या हातात वडापाव टेकवला म्हणजे ग्राहक समाधानी होतील असं नाही. मुंबईतले जे कोणते वडापाव प्रसिद्ध आहेत, त्या वडापावासोबत तुम्हाला गोड चटणी दिली जाते, ज्या वडापावासोबत गोड चटणी असते, त्या वडापावाची महती मुंबईकर डोक्यावर घेऊन सांगतात.
पार्लेश्वरच्या वडापावासोबतही तुम्हाला सर्व प्रकारच्या चटण्या मिळतात, गोड तिखट आंबट सर्व प्रकारच्या, त्यातल्या त्यात मुंबईत चिंचेची चटणी वापरून कुणी वडापाव देत असेल, तर त्याचा आम्हाला शोध आहे, असा वडापाव मुंबईत असेल तर नक्कीच तुमच्यासमोर त्याची महती सांगू.