कोल्हापूरकर घराबाहेर पडू नका; लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे

Updated: May 16, 2021, 08:13 AM IST
कोल्हापूरकर घराबाहेर पडू नका; लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात title=

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. पुढील सात दिवस म्हणजेच 23 मे पर्यंत कोल्हापूरात लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन दरम्यान नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 

कोल्हापूरातील कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून 23 तारखेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.

कोल्हापूरकरांना फक्त वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडता येणार आहे. किरणामाल, भाजीपाला दुकानेदेखील या काळात बंद राहणार आहे. जिल्ह्यात फक्त दूध विक्री केंद्र आणि दूध संकलन केंद्र सुरू राहणार आहेत.

शेतीशी संबधीत कामं सुरू ठेवण्याला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

-----------------------------------------

राज्यात आज 39 हजार 923 नव्या रूग्णांची नोंद

राज्यात आता कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 39 हजार 923 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 695 रूग्णांचं निधन झालं आहे. त्याचप्रमाणे 53 हजार 249 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 53 लाख 9 हजार 215 इतकी आहे. तर आतापर्यंत एकुण 79 हजार 552 रूणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x