काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली

कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर काँग्रेस खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांची पुन्हा प्रकृती खालावली आहे. 

Updated: May 15, 2021, 02:06 PM IST
काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली  title=
संग्रहित फोटो

मुंबई / पुणे :  कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर काँग्रेस खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांची पुन्हा प्रकृती खालावली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राजीव सातव यांना आता न्युमोनियाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर पुण्यामध्ये रुग्णालयात उपचार सुरु आहे. (Congress MP Rajiv Satav's health deteriorated again) 

काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राजीव सातव यांनी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. पण आता त्यांची प्रकृती पुन्हा खालवली असल्याची माहिती देण्यात आली आहे.  सातव यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर पुण्यात जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. प्रकृती खालावल्याने 25 एप्रिल रोजी त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. तर काही दिवस त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरही ठेवण्यात आले होते. 

दरम्यान, राजीव सातव यांना आता न्युमोनियाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.  कोरोनाची लागण झाल्यामुळे सातव यांना खूप धकवा जाणवत होता. त्यांची प्रकृती बिघडल्याने चिंता व्यक्त केली जात होती. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी जहांगीर रुग्णालयाला भेट देत सातव यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांशी चर्चा केली होती. त्यानंतर कदम यांनी प्रकृती स्थिर असून ते कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गावर नक्की मात करतील, अशा विश्वास व्यक्त केला होता.

राजीव सातव यांना 19 एप्रिलपासून थोडे बरे वाटत नव्हते. कोविडची लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्यांनी 21 एप्रिल रोजी कोरोना चाचणी केली. 22 एप्रिल रोजी या रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांनी ट्विट करत संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करुन घ्यावी, असे आवाहन केले होते.