धोका वाढला; महाराष्ट्रात कोरोनाचे १३४ नवे रुग्ण, पुण्यात आणखी दोघांचा मृत्यू

राज्यातील एकूण कोरोना  रुग्णांची संख्या १८९५वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान आणखी वाढले आहे.  

Updated: Apr 12, 2020, 02:32 PM IST
धोका वाढला; महाराष्ट्रात कोरोनाचे १३४ नवे रुग्ण, पुण्यात आणखी दोघांचा मृत्यू title=

पुणे: देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र असलेल्या महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे १३४ नवे रुग्ण आढळून आले. तर पुण्यातील कोरोनाच्या दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुण्यातील कोरोनाचा मृत्यूदर देशातील इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. पुण्यातील कोरोना मृतांची संख्या आता ३१ वर जाऊन पोहोचली आहे. तर राज्यातील एकूण कोरोना  रुग्णांची संख्या १८९५वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान आणखी वाढले आहे.

कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार धक्का, वर्ल्ड बँकेचा इशारा

दरम्यान, आज नव्याने आढळलेल्या १३४ रुग्णांमध्ये मुंबईतील ११३ जणांचा समावेश आहे. तर रायगड, अमरावती, भिवंडी, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी एक, तर पुण्यात ४, मीरा-भाईंदरमध्ये ७ तर नवी मुंबई, ठाणे आणि वसई-विरारमध्ये कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळून आले. 

लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर फिरत असलेल्या टोळक्याने तलवारीने छाटला पोलिसाचा हात

आज पुण्यात मृत्यू झालेले दोघेजण ठाणे आणि अहमदनगर येथे वास्तव्याला होते. या दोन्ही रुग्णांना इतर व्याधीही होत्या. तसेच गेल्या २४ तासांत १७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १२७वर गेली आहे. यात वयोवृद्धांचा सर्वाधिक समावेश असून करोनासह मधुमेह, रक्तदाब आणि न्यूमोनियासारखे आजारही या रुग्णांना असल्याचं आढळून आले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणांवर लवकरच रॅपिड टेस्टला सुरुवात होणार आहे. मुंबईतील धारावी परिसर हा सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. आज याठिकाणी कोरोनाचे १५ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे या परिसरातील सर्व नागरिकांची लवकरच रॅपिड टेस्ट होणार आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असणारी किटस् अजून प्रशासनाला उपलब्ध झालेली नाहीत.