नागपुरात तलावात दोन अल्पवयीन तरुणींचे मृतदेह

तलावात दोन तरुणींचे मृतदेह आढल्याने खळबळ उडालेय. दरम्यान, या अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.

Updated: Nov 12, 2017, 12:01 AM IST
नागपुरात तलावात दोन अल्पवयीन तरुणींचे मृतदेह  title=

नागपूर : तलावात दोन तरुणींचे मृतदेह आढल्याने खळबळ उडालेय. दरम्यान, या अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.

कोराडी मंदिर परिसरातील तलावात हे मृतदेह सापडलेत. आसना रोकडे (१७), मनीषा पटले (१७) अशी दोघींची नावे आहेत. या दोघी ९ नोव्हेंबरपासून जरीपटका परिसरातून बेपत्ता होत्या.