Xiaomi च्या पहिल्या ड्युअल कॅमेरा स्मार्टफोनची आजपासून विक्री

शाओमीनं त्यांचा पहिलाच ड्युअल कॅमेरा स्मार्टफोन Mi A1 भारतामध्ये लॉन्च केला आहे. या फोनची किंमत १४,९९९ रुपये आहे. शाओमीचा हा स्मार्टफोन mi.com आणि ई कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

Updated: Sep 12, 2017, 05:15 PM IST
Xiaomi च्या पहिल्या ड्युअल कॅमेरा स्मार्टफोनची आजपासून विक्री title=

मुंबई : शाओमीनं त्यांचा पहिलाच ड्युअल कॅमेरा स्मार्टफोन Mi A1 भारतामध्ये लॉन्च केला आहे. या फोनची किंमत १४,९९९ रुपये आहे. शाओमीचा हा स्मार्टफोन mi.com आणि ई कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

१२ सप्टेंबर म्हणजेच आजपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ब्लॅक, गोल्ड आणि रोज गोल्ड या तीन रंगांमध्ये हा फोन असणार आहे. लॉन्च ऑफरवर एअरटेल 300GB एक्स्ट्रा ४जी डेटा देत आहे. 

काय आहेत फोनचे फिचर्स?

५.५ इंच फूल एचडी डिस्प्ले

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर

४ जीबी रॅम

६४ जीबी इंटरनल मेमरी, १२८ जीबी एक्सपांडेबल मेमरी

७.१.२ अॅन्ड्रॉईड नॉगट आऊट ऑफ द बॉक्स

१२ मेगापिक्सल+१२ मेगापिक्सल कॅमेरा टेलीफोटो आणि वाईट अॅन्गल लेन्स

५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा

3,080mAh बॅटरी