Auto News: भारतात मारुती सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. कारण मारुती सुझुकीची अल्टो, वॅगनआर आणि एस-प्रेसोसारख्या गाड्या स्वस्त आणि परवडणाऱ्या आहेत. मात्र आता मारुती सुझुकी आपली अल्टो, वॅगनआर, एस-प्रेसो सारखी स्वस्त वाहने बंद करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. प्रत्येक वाहनात किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर कंपनी याबाबतचा निर्णय घेऊ शकते.
कंपनीचे चेअरमन आरसी भार्गव यांनी याबाबत म्हटले आहे की, सरकारच्या धोरणाचा परिणाम त्यांच्या छोट्या कारवर होत आहे. अशा स्थितीत कंपनी या गाड्या बंद करण्यास मागेपुढे पाहणार नाही. प्रत्येक कारमध्ये 6 एअरबॅग्जच्या नियमामुळे, मारुतीची स्वस्त हॅचबॅक सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर जाणार आहे. अशा परिस्थितीत कंपनी त्यांना बंद करण्याचाही विचार करू शकते.
देशात दरवर्षी पाच लाख रस्ते अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. गडकरी म्हणाले होते की की, 'आम्ही वाहनांमध्ये किमान सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला लोकांचे प्राण वाचवायचे आहेत.'