मुंबई : व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक महत्वाची बातमी आहे. तुम्हीही व्हॉट्सअॅप युजर्स आहात तर ही बातमी नक्की वाचा अन्यथा तुमचं व्हॉट्सअॅप बंद होऊ शकतं. व्हॉट्सअॅपने इंस्टंट मेसेजिंग अॅपमध्ये काही बदल केले आहेत ज्यामुळे व्हॉट्सअॅप अपडेट झाल्यानंतर हे अॅप काही फोन्समध्ये काम करणार नाहीये. ज्या फोन्समध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही अशा फोन्सची लिस्ट व्हॉट्सअॅपतर्फे प्रसिद्ध केली आहे.
अॅप्लिकेशन अपडेट केल्यावर ते सर्वच फोन्समध्ये चालणार नाहीये अशी माहिती व्हॉट्सअॅपतर्फे देण्यात आली आहे. अॅप अपडेट केल्यावर काही फिचर अचानकपणे काम करणं बंद करतील म्हणजेच अॅप बंद होईल. व्हॉट्सअॅपची पॅरंट कंपनी फेसबुकने सांगितलं की, व्हॉट्सअॅप जुन्या ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणार नाहीये.
व्हॉट्सअॅपने काही फोनची कॅटेगरी प्रसिद्ध केली आहे ज्यांच्या ऑपरेटिंग सिस्टमवर अॅप चालणार नाही.
- 2.3.3 पेक्षा जुने अँड्राईड फोन
- 8.0 आणि त्यापेक्षा जुने विंडोज फोन
- आयफोन 3जीएस / आयओएस 6
- नोकिया सिम्बियन एस 60
- ब्लॅकबेरी ओएस आणि ब्लॅकबेरी 10
फेसबुकने सांगितलं की, जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर आता व्हॉट्सअॅपचं नवं अकाऊंट सुरु होणार नाही. नोकिया एस40वर डिसेंबर 2018 पर्यंत अॅप चालत राहील. तर, अँड्रॉईड 2.3.7 आणि इतर फोनवर एक फेब्रुवारी 2020 पर्यंत चालणार. तसेच IOS 7 आणि इतर फोन्सवर एक फेब्रुवारी 2020 पर्यंत चालणार आहे.