व्हाट्सअॅपच्या 'या' नव्या फीचरमुळे करा कॅशलेस व्यवहार...

Whatsapp ने अलिकडेच दोन नविन फ़िचर्स युजर्ससाठी आणले होते.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 31, 2017, 07:31 PM IST
व्हाट्सअॅपच्या 'या' नव्या फीचरमुळे करा कॅशलेस व्यवहार...  title=

नवी दिल्ली : Whatsapp ने अलिकडेच दोन नविन फ़िचर्स युजर्ससाठी आणले होते. एक म्हणजे लाईव्ह लोकेशन आणि दुसरं म्हणजे डिलीट फॉर एव्हरीवन. त्यातच अजून एका नवीन फीचरची जोड मिळण्याची शक्यता आहे. आणि ते फीचर युजेर्साठी अतिशय उपयुक्त ठरेल.

वृत्तानुसार कंपनी हे फीचर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हे डिसेंबरपर्यंत लॉन्च होऊ शकतं. या फीचर्समुळे तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधील हव्या त्या व्यक्तीशी डिजीटल ट्रांजेक्शन चा व्यवहार करू शकता. या फीचरची अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. फॅक्टर डेलीच्या वृत्तानुसार व्हाट्सअॅप  पेमेंट फीचर वर गेल्या काही काळापासून काम चालू होते आणि आता हे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. कंपनीने अॅपमध्ये पेमेंट ऑप्शन देण्याची तयारी केली आहे. हे फीचर डिसेंबरपर्यंत भारताडोबात इतर देशातही येण्याची आशा केली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये या फीचरची बीटा टेस्टिंग होईल. त्यानंतरच हे फीचर सामान्य युजर्ससाठी उपलब्ध होईल. मात्र अजूनही व्हाट्सअॅपकडून या संदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. हे फीचर लॉन्च झाल्यानंतर डिजीटल वॉलेट कंपन्यांसाठी स्पर्धा अधिक वाढेल. रिपोर्टनुसार व्हाट्सअॅप या फीचरसाठी बँक ऑफ इंडीया (SBI),  ICICI आणि HDFC बँकांशी बातचीत करत आहे. मात्र अद्यापही  बँकेकडून कोणतीही माहिती मिळाली नाही.