मुंबई : व्हॉट्सअॅपचा वापर अनेक जण (WhatsApp Users) करतात. भारतात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या ही 40 कोटी इतकी आहे. व्हॉट्सअॅपच्या अनेक फीचर्सबाबत अनेकांना माहिती आहे. व्हॉट्सअॅपसाठी मोबाईल नंबर आवश्यक असतो. तुम्हाला कुणी म्हणाला की विना मोबाईल नंबर व्हॉट्सअॅप वापरता येतो? खरं वाटेल का. (tech news know how to create whatsapp account without mobile number and to landline number)
व्हॉट्सअॅपचा वापरण्यासाठी एक्टीव्ह नंबरची हवाच असतो. मात्र तो मोबाईल नंबरच हवा असं गरजेचं नसतं. लँडलाईन नंबर वापरुनदेखील व्हॉट्सअॅप अकाउंट तयार करु शकता. हे काम खूप सोपं आहे. नक्की कसं करायचं हे आपण जाणून घेऊयात.
मोबाईलमध्ये जितक्या सहजतेने व्हॉट्सअॅप अकाउंट क्रिएट करता येतं तितक्याच सहजतेने लँडलाइन नंबरवरुन करु शकता. यासाठी तुमहाला एक एक्टीव्ह लँडलाइन नंबर द्यावा लागेल. त्यानंतर मोबाईल नंबररप्रमाणेच प्रॉसेस फॉलो करायची आहे.
सर्वात आधी फोन किंवा डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप इन्स्टॉल करा.
येथे तुम्हाला नंबर टाकावा लागेल. लँडलाइन नंबर टाकावा लागेल आणि तुमचा कंट्री कोड (Country Code) कोड टाकायला विसरू नका.
त्यानंतर आता तुम्हाला एक व्हेरिफिकेशन SMS येईल. इथे तुम्ही Call Me टॅब इनेबल होण्याची वाट पहावी लागेल. हा बटन एक्टीव्ह होताच क्लिक करा.
आता तुमच्या लँडलाइनवर एक कॉल येईल, ज्यावर तुम्हाला वेरिफिकेशन कोड मिळेल. 6 अंकी वेरिफिकेशन कोड टाकल्यानंतर Next टॅबवर क्लिक करा. अशा प्रकारे अकाउंट सेट करू शकता.
अकाउंट सेट झाल्यानंतर व्हॉट्सअॅप वापरता येईल. मात्र अकाउंट क्रीएट करताना एक्टीव्ह असलेला लँडलाईन नंबर टाकावा लागेल.