मुंबई : अनेक ग्रामीण भागात आणि शहरी भागात आजही लाईट जाते. त्यामुळे नागरीकांना अंधारातच राहावे लागते. या अंधारातून सुटका मिळावी यासाठी काही नागरीक घरी इन्व्हर्टर लावतात. मात्र काहींना इन्व्हर्टरही परवडत नाही. त्यात आता असा एक प्रोडक्ट समोर आला आहे, जो लाईट गेल्यावरही तुम्हाला उजेड देणार आहे. हा प्रोडक्ट आहे रिचार्जेबल एलईडी बल्ब. जाणून घेऊय़ात या प्रोडक्टबद्दल.
ई-कॉमर्स (E-Commerce) प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अनेक उत्तम प्रोडक्ट मिळतात. यातील एक प्रोडक्ट म्हणजे रिचार्जेबल एलईडी बल्ब (Rechargeable LED Bulb). हा बल्ब तुमच्या इन्व्हर्टर आणि इतर गरजा कमी करू शकतो. कारण यासाठी तुम्हाला कोणत्याही बाह्य उर्जा स्त्रोताची गरज भासणार नाही. हा बल्ब तुम्ही सामान्य बल्बप्रमाणे वापरू शकता.
विशेष म्हणजे जोपर्यंत वीज आहे तोपर्यंत हा बल्ब विजेवर चालणार आहे. वीज गेल्यानंतर त्यातील बॅटरी उर्जेचा स्रोत म्हणून काम करेल. म्हणजेच, तुम्हाला इन्व्हर्टरची गरज भासणार नाही. किंवा इतर कोणत्याही स्त्रोताशी जोडण्याची आवश्यकता नाही. आम्ही अशाच काही प्रोडक्टची यादी घेऊन आलो आहोत. या यादीतील बल्ब तुम्हाला अशी सेवा देणार आहेत.
विप्रो रिचार्जेबल एलईडी बल्ब
तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून विप्रो (Wipro) रिचार्जेबल एलईडी बल्ब खरेदी करू शकता. कंपनीने ते Amazon वर इमर्जन्सी बल्ब म्हणून लिस्ट केले आहे. तुम्ही 348 रुपयांमध्ये 9 वॅट क्षमतेचा रिचार्जेबल एलईडी बल्ब खरेदी करू शकता. यात 2200mAh लिथियम-आयन बॅटरी आहे. तर हा बल्ब 6 महिन्यांच्या वॉरंटीसह येतो.
Halonix रिचार्जेबल एलईडी
तुम्ही हालोनिक्स (Halonix) रिचार्जेबल एलईडी बल्ब देखील खरेदी करू शकता, ज्याची किंमत 349 रुपये आहे. दोन बल्बच्या पॅकची किंमत 689 रुपये आहे. ही किंमत 9W LED बल्बसाठी आहे.
फिलिप्स बल्ब
तुम्ही फिलिप्स (Philips) बल्ब देखील खरेदी करू शकता. त्याच्या 12W क्षमतेच्या वेरिएंटची किंमत 629 रुपये आहे. 10W रिचार्जेबल एलईडी बल्ब 549 रुपयांना मिळतो. तुम्हाला Amazon-Flipkart वर इतरही अनेक पर्याय मिळतील.
जर तुमच्या परीसरात सतत लाईट जातेय आणि तुमच्या जवळ इन्व्हर्टर नसेल, तर हा सर्वोत्तम पर्याय आहे. घरांमध्ये वापरल्या जाणार्या सामान्य एलईडी बल्बऐवजी तुम्हाला अशा रिचार्जेबल्बचा वापर फायद्याचा ठरणार आहे.