तुम्हाला किंवा तुमच्या मित्र मंडळींना गुगलवर संशय आलाय का? संशय म्हणजे तुम्ही जे आपल्या मित्र मंडळींसोबत बोलतात, चर्चा करतात त्याचसंबंधी जाहिराती तुम्हाला पाहायला मिळतात? चला तर जाणून घेऊयात खरंच गुगल तुम्हाला ऐकतंय का?
तुमच्या फोनमधील गुगल व्हॉइस असिस्टंट या सेवेबाबत तर तुम्हाला माहितीच असेल. ज्यावर फक्त Ok Google बोलून तुम्ही तुमची आवडती गाणी लावू शकतात, AC चालू बंद करू शकतात,जेवण ऑर्डर करू शकतात, हवी ती माहिती मिळवू शकतात, मॅप लावू शकतात आणि अनेक गोष्टी करू शकतात. आता प्रश्न उपस्थित होत तो म्हणजे खरंच यामाध्यमातून गुगल तुमच्या सर्व प्रायव्हेट गोष्टीही ऐकताय का?
तुमची तुमच्या मित्रांसोबत एखादा मोबाईल विकत घेण्याबद्दलचर्चा झाली असेल आणि आणि काही तासानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर स्मार्टफोनच्या जाहिराती दिसायला सुरवात होते?
2016 मध्ये BBC रिपोर्टर Zoe Kleinman यांनी अशाच प्रकारच्या घटनेचा उल्लेख केलेला. एका कार अपघातात एका मित्राच्या जाण्याची दुःखद बातमी Zoe Kleinman याना मिळालेली. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याबाबत माहिती त्यांना गुगलवर पाहायला मिळाली होती. ही काही पहिलीच वेळ नसल्याचं त्या सांगतात.
दररोज असे अनेक युजर्स मिळतील ज्यांची गुगलकडून त्यांच्यावर लक्ष ठेवलं जातंय की काय अशी तक्रार आहे. या निव्वळ योगायोग समजावा की खरंच गुगल तुमच्यावर नजर ठेवून आहे? लोकांच्या म्हणण्यानुसार ते कोणत्याही एखाद्या विषयावर चर्चा करत असतात आणि त्यांना त्याच्याच जाहिराती दिसायला सुरुवात होते.
हा केवळ योगायोग असू शकतो. कारण गुगलच्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार तुमच्या परवानगीशिवाय गुगल तुमची कोणतीही गोष्ट रेकॉर्ड करू शकत नाही. मात्र आपल्या सर्वांना हेही ठाऊक आहे की जाहिराती दाखवण्यासाठी गुगल किंवा फेसबुकसारख्या कंपन्यांना युजर्सच्या डेटाची गरज असते.
अशात तुम्ही तुमचं आयुष्य डी गुगल करू शकतात. यासाठी तुम्ही गुगल क्रोम शिवाय इतर ब्राऊझर्सचा वापर करू शकतात. यासाठी तुम्ही DuckDuckGo किंवा Brave ब्राउझर वापरू शकतात. यावर तुम्हाला जाहिराती दिसणार नाहीत.
याआधीच गुगल आणि फेसबुक सारख्या दिग्गज कंपन्यांनी ते युझर्सच्या स्मार्टफोनमधील मायक्रोफोनच्या वापर करत नसल्याचा दावा केलाय.
फेसबुकच्या माहितीनुसार कंपनी ब्रँड्सना युझरच्या मायक्रोफोन संभाषणावर आधार जाहिराती दाखवण्यापासून रोखते. गुगलने याआधीच दावा केलाय. मग प्रश्न राहतो की तुम्हाला अशा जाहिराती का दिसतात?
याची एक शक्यता म्हणजे तुमचं डिव्हाईस सिंक असू शकतं. अनेकदा युझर्स वेगवेगळ्या डिव्हाईसेससाठी एकंच अकाउंट वापरतात. अशात तुमची कोणत्या वेगळ्या डिव्हाइसवर माहिती सर्च केली, तरीही तुम्हाला तुमची जास्त वापरात असलेल्या डिव्हाइसवर जाहिराती पाहायला मिळू शकतात.
is google listening your private conversation with artificial inteligence