असा आहे रिलायन्स जिओ फोन

रिलायन्स जिओच्या फोनची सर्वचजण वाट पाहत आहेत. पण हा फोन नेमका कसा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला या फोनसंदर्भात सांगणार आहोत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 22, 2017, 08:19 PM IST
असा आहे रिलायन्स जिओ फोन title=

नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या फोनची सर्वचजण वाट पाहत आहेत. पण हा फोन नेमका कसा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला या फोनसंदर्भात सांगणार आहोत.

बहूप्रतिक्षित आणि स्वस्त अशा जिओ फोनची प्री-बुकींग झाल्यानंतर हा फोन हातात कधी मिळणार याची सर्वचजण वाट पाहत आहते. आता हा फोन लवकरच ग्राहकांना लवकरच मिळणार आहे. पाहूयात या बहूप्रतिक्षित फोनमध्ये आहे तरी काय?

फोनमध्ये कंपनीतर्फेच जिओचं एक सिमकार्ड दिलं जाणार आहे. या फोनमध्ये केवळ एकच सिमकार्ड वापरता येऊ शकतं. फोनमध्ये ब्लू़टूथ आणि बॅटरीसंदर्भात कंपनीने केलेले दावे किती योग्य आहेत हे नंतरच स्पष्ट होईल.

फोनचे फिचर्स...

- मोठी स्क्रिन वापरणाऱ्यांना जिओफोन एकदमच लहान वाटेल. या फोनचा २.४ इंचाचा डिस्प्ले आहे

- रिलायन्स जिओ फोनमध्ये २ मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा आणि व्हीजीए फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे

- फ्रंटचा व्हीजीए कॅमेरा साधारण आहे मात्र, व्हिडिओ कॉलिंगमध्ये व्हिडिओ क्लेअर दिसतो

- या फोनमध्ये ५१२ एमबीची रॅम आणि ड्युअल प्रोसेसर देण्यात आला आहे

- बॅटरी २००० mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे. या बॅटरीच्या आधारे १२ तासांचा टॉकटाईम असल्याचा दावा कंपनीने केला आहे

- फोनमध्ये इंटरनल मेमरी ४जीबी देण्यात आली आहे आणि ही मेमरी १२८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते

जिओ टीव्ही कंटेंट टीव्हीवर ब्रॉडकास्ट

कंपनीने दावा केला आहे की, फोनमध्ये जिओ अॅप देण्यात आलं आहे. याच्या मदतीने टीव्ही कंटेंट तुम्ही टीव्हीवर ब्रॉडकास्ट करु शकता. यासाठी तुम्हाला केवळ एका मीडिया केबलची आवश्यकता लागणार आहे. जिओ टीव्ही अॅपमध्ये जे टीव्ही चॅनल्स प्रसारित केले जातील त्यात कुठल्याही प्रकारचं बफरिंग होणार नाही. म्हणजेच लाईव्ह टेलिकास्ट करताना रिअल टाईम व्हिडिओ पहायला मिळणार आहे.