खास सेल्फी प्रेमींसाठी मायक्रोमॅक्सने लॉन्च केला सेल्फी ३ स्मार्टफोन

स्मार्टफोन युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, मायक्रोमॅक्स कंपनीने सेल्फीप्रेमींसाठी नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 22, 2017, 05:50 PM IST
खास सेल्फी प्रेमींसाठी मायक्रोमॅक्सने लॉन्च केला सेल्फी ३ स्मार्टफोन title=

मुंबई : स्मार्टफोन युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, मायक्रोमॅक्स कंपनीने सेल्फीप्रेमींसाठी नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

वाढतं सेल्फी फ्याड लक्षात घेऊन मायक्रोमॅक्स कंपनीने सेल्फीप्रेमींसाठी आपला सेल्फी ३ स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनमध्ये तब्बल १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

मायक्रोमॅक्स सेल्फी ३ या फोनची विक्री संपूर्ण देशभरातील रिटेल स्टोअर्समध्ये सुरु करण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक आणि ब्ल्यू कलर्समध्ये उपलब्ध आहे. यापूर्वी कंपनीने कॅनवास इनफिनिटी लॉन्च केला होता.

मायक्रोमॅक्स सेल्फी ३ या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३५ प्रोसेसर, ३जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज देण्यात आलं आहे.

या फोनमध्ये फ्लॅश लाईटसोबत १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर, ड्युअल सिम सपोर्ट, ३००० एमएएचची बॅटरी, एफएम रेडिओ देण्यात आला आहे. या फोनची किंमत ११,९९९ रुपये आहे.