मारुती Alto नव्या रुपात, 30 KM असणार मायलेज, किंमत केवळ...

पाहा नवी मारुती अल्टो...

Updated: Jun 16, 2018, 11:39 AM IST
मारुती Alto नव्या रुपात, 30 KM असणार मायलेज, किंमत केवळ... title=
Image: www.reviewtalks.com

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकी कंपनीच्या गाड्यांमध्ये विक्रीत अव्वल असलेल्या अल्टो कारचं नवं मॉडल लवकरच लॉन्च होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्टोचं नवं मॉडल 2019 मध्ये लॉन्च केलं जाण्याची शक्यता आहे. न्यू जनरेशन मारुती अल्टो सध्याच्या मॉडेलपेक्षा खूपच वेगळी असणार आहे. मात्र, यासंदर्भात कंपनीने अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये. मात्र, 2019 मध्ये नवी अल्टो लॉन्च केली जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

यासोबतच कंपनी 2020 पर्यंत इतरही नव्या कार लॉन्च करण्याची योजना आखत आहे. काही दिवसांपूर्वी वृत्त आलं होतं की, 2019 मध्ये मारुती झेन पून्हा एकदा बाजारात लॉन्च केली जाणार मात्र, आता ही कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या रुपात बाजारात येणार आहे.

बाजार विश्लेषकांच्या मते, अल्टो न्यू जनरेशन मॉडेल पुढील वर्षी फेस्टिव्ह सीजनपर्यंत बाजारात येऊ शकते. न्यू जनरेशन अल्टो ही सध्याच्या गाडीपेक्षा खूपच वेगळी असेल. यामधील इंटेरियर आणि एक्सटीरियर दोन्हीत फार बदल असेल.

कार ब्लॉग इंडिया मध्ये आलेल्या वृत्तानुसार, नव्या अल्टोचं इंटेरियर पूर्वीपेक्षा स्टायलिश असेल. याचं इंटेरियर टच-स्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टमसह असणार आहे. सर्वात मोठा बदल हा कारच्या इंजिनमध्ये असणार आहे. अपेक्षा केली जात आहे की, 2019 मारुती अल्टो गाडीत 660 cc चं पेट्रोल इंजिन असणार आहे. या कारचा मायलेज 30 kmpl असेल.

सध्याच्या कारपेक्षा अधिक सेफ्टी फिचर्स देऊन नवी कार तयार केली जात आहे. नवी अल्टो आकाराला मोठी आणि स्पेसियस असणार आहे. अल्टोचा नवा लूक हा काही प्रमाणात इग्निस कारशी मिळता-जुळता आहे. या कारचं भारतात टेस्टिंगही केलं असल्याचं वृत्त आहे. कारची सुरुवाती किंमत 2.6 लाख रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.