Mahindra XUV700 Price: तुम्ही नवी कार घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण महिंद्रानं लोकप्रिय एसयूव्ही XUV700 गाडीची किंमत कमी केली आहे. या एकमेक गाडीत ADAS सारखं दमदार फिचर आहे. या एसयूव्हीची किंमत 13.18 लाखांपासून सुरु होते आणि 24.58 लाख रुपयांपर्यंत जाते. महिंद्राची ही फीचर लोडेड कार आहे. यात 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 6-वे पॉवर ड्रायव्हर सीट, 12 स्पीकर, पॅनोरामिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, बिल्ट-इन अलेक्सा आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. या वाहनाचा प्रतीक्षा कालावधी सध्या 16 महिन्यांपर्यंत आहे.
लाइव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार महिंद्रा कंपनीनं आपल्या निवडक व्हेरियंटची किंमत कमी केली आहे. किंमत 6000 रुपयांनी कमी केली आहे. चला तर जाणून घेऊयात या लिस्टमध्ये कोणकोणते व्हेरियंट आहेत...
पेट्रोल इंजिन AX5 5S MT, AX5 7S MT, AX7 MT, AX5 5S AT, आणि AX7 AT मॉडेल्स आणि डिझेल इंजिन AX5 5S MT, AX5 7S MT, AX7 7S MT, AX5 5S AT, AX5 7S AT, AX7 AT आणि AX7 AWD AT या मॉडेलच्या किमतीत कपात करण्यात आली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीने महिंद्रा XUV700 च्या व्हेरियंटनुसार वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा केली. AX3 मॉडेलवर मागील वायपर आणि डिफॉगर नाही. कंपनीने AX3 चे दरवाजे आणि बूट-लिडसाठी निवडक अनलॉक फंक्शन देखील काढून टाकलेत.