गरज पडल्यास युजर्सला 5 GB डेटा फ्री; या टेलिकॉम कंपनीचा धमाकेदार प्लॅन

रिलायंन्स जिओ आपल्या वापरकर्त्यांना एक खास आपत्कालीन डाटा प्लॅन सेवा ऑफर करीत आहे. ज्यामध्ये तुम्हाला 5 GB पर्यंतचे इंटरनेट फ्री मिळू शकते. तुम्हाला रिचार्जच्यावेळी त्याचे शुल्कही द्यावे लागणार नाही.

Updated: Nov 7, 2021, 01:41 PM IST
गरज पडल्यास युजर्सला 5 GB डेटा फ्री; या टेलिकॉम कंपनीचा धमाकेदार प्लॅन title=

नवी दिल्ली : सध्याच्या काळात सर्व कंपन्या अनेक प्लॅन आणत असतात. ज्यामध्ये त्यांच्या वापरकर्त्यांचा फायदा होत असतो. रिलायंन्स जिओदेखील एक अशीच प्राइवेट लिमिटेड कंपनी आहे. जी सध्या देशातील क्रमांक 1ची टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीच्या एमरजंसी प्लॅनबाबत आपण माहिती घेणार आहोत.

गरज पडल्यास लगेच मिळवा इंटरनेट
जिओचा एमरजंसी डेटा प्लॅन (Emergency Data Plan) एक असा प्लॅन आहे ज्याच्या मदतीने तुम्ही लगेच कोणतेही शुल्क न देता डाटा रिचार्च करू शकता. जर तुम्ही अशा जागी आहात जेथून पैसे खर्च करणे किंवा रिचार्ज करणे कठीण आहे. अशावेळी तुम्ही जिओच्या ऍपवर जाऊन एमरजंसी प्लॅनला ऍक्टिवेट करू शकता. तुम्हाला विना पैशाचे इंटरनेट मिळू शकते. त्याचे पेमेंट तुम्ही नंतर करू शकता.

जिओचा 'रिचार्ज नॉऊ ऍंड पे लेटर' एमरजंसी प्लॅन
जिओच्या मोबाईल ऍपवर जाऊन तुम्ही एमरजंसी डाटा प्लॅनला सिलेक्ट करून 1 GB डेटा घेऊ शकता. आणि तुम्हाला त्या वेळी शुल्क देखील द्यावे लागणार नाही. याचाच अर्थ जिओ कर्जाच्या स्वरूपता तुम्हाला डेटा देत असते. (recharge now and pay later)

प्लॅनचे शुल्क
या प्लॅनसाठी तुम्हाला 11 रुपयात 1 GB डेटा मिळणार आणि 5 GB इंटरनेट हवे असल्यास जिओ ऍपवर जाऊन एमरजंसी डेटा प्लॅनला एकूण 5 वेळा ऍक्टिवेट करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला 55 रुपयांत 5 GB डेटा मिळू शकतो. त्याचे पेमेंट तुम्ही हवे तेव्हा करू शकता.