iPhone 13 Pro Max फक्त 20 हजार रुपयात! या ऑनलाईन पोर्टलवर खास ऑफर

कुठे आणि कशी ऑफर आहे जाणून घ्या...

Updated: Aug 8, 2022, 12:22 PM IST
iPhone 13 Pro Max फक्त 20 हजार रुपयात! या ऑनलाईन पोर्टलवर खास ऑफर title=

मुंबई : Apple iPhones ची खूप क्रेझ आहे. हा एक असा फोन आहे जो प्रत्येकाला खरेदी करायचा आहे. मात्र, कमी बजेटमुळे त्यांना स्वस्त स्मार्टफोन घ्यावा लागतो. Apple ने गेल्या वर्षीच iPhone 13 Pro Max लॉन्च केला होता, ज्याची किंमत सुमारे 1.5 लाख आहे. बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर मिळाल्यानंतरही त्याची किंमत फारशी कमी होत नाही. Flipkart आणि Amazon या ऑनलाइन शॉपिंग अॅपवर iPhone वर डिस्काउंट आहेत, पण एका ठिकाणी iPhone 13 Pro Max वर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. हा फोन फक्त 20 हजार रुपयांना खरेदी करता येईल. जाणून घेऊया काय आहे ही डील...

Facebook Market Place हे एक असे ठिकाण आहे. जिथे स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्तात विकल्या जातात. असे बरेच लोक आहेत जे iPhone 13 Pro Max फक्त 20 हजार रुपयांना विकत आहेत. कोणाला फोन घ्यायचा असेल तर तो दुकानदाराशी संपर्क साधू शकतो. डीलर्सच्या म्हणण्यानुसार फोनचा स्टॉक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही आरामात फोन खरेदी करू शकता.

iPhone 13 Pro Max (128GB) ची किंमत 1,29,900 रुपये आहे, तर 512GB व्हेरिएंटची किंमत 1,59,900 रुपये आहे. याचा अर्थ फेसबुकची डील तुमच्यासाठी चांगली असणार आहे. फोनवर पहिल्यांदाच एवढी मोठी सूट पाहायला मिळत आहे. फोन विकत घेण्यापूर्वी तुम्हाला थोडं काळजीपूर्वक शोधावं लागेल. कारण इथे कोणीही पोस्ट करू शकतो.

डील फाइनल करण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासा. कारण फेसबुकवरही लोक ब्रँडेड फोनची फर्स्ट कॉपी विकतात. म्हणजेच, तुम्ही विकत घ्याल तो फोन iPhone 13 Pro Max सारखा दिसेल, परंतु आत तो Android फोन असू शकतो. त्यामुळे खरेदी करताना थोडी काळजी घ्या.