मुंबई : तुम्ही इन्स्टंट मेसेजिंग अॅप टेलीग्राम देखील वापरता का? जर वापरत असाल आणि तुम्हाला त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा हे माहित नसेल, तर आज आम्ही तुम्हाला त्याची प्रक्रिया सांगणार आहोत. टेलिग्रामवर नंबर बदलणे अगदी सोपे आहे. तुम्ही ते डेस्कटॉपवरून देखील बदलू शकता.
इन्स्टंट मेसेजिंग app आजकाल प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्ते वापरतात. व्हॉट्सअॅप असो वा टेलिग्राम, दोन्ही प्लॅटफॉर्म खूप लोकप्रिय आहेत. अनेक वेळा यूजर्सला त्यांचा नंबर बदलावा लागतो, पण त्या app वर त्यांचा नंबर कसा अपडेट करायचा हे त्यांना माहित नसते. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही नंबर कसा बदलू शकता ते आता आपण समजून घेऊयात.
जर तुम्ही नंबर बदलला असेल आणि तो मेसेजिंग appवर अपडेट करू इच्छित असाल तर या स्टेप्स फॉलो करा.
1. सर्व प्रथम टेलीग्राम app उघडा. आता वरच्या डाव्याबाजूवरील मेनू पर्याय निवडा. आता सेटिंग्जवर जा.
2. सेटिंग्जवर क्लिक केल्यानंतर, जे पेज उघडेल ते तळाशी खात्याजवळ मोबाइल नंबर दिसेल.
3. तुम्हाला मोबाईल नंबरवर क्लिक करावे लागेल. मोबाईलवर क्लिक केल्यावर एक नवीन पेज उघडेल. येथे चेंज नंबर पर्यायावर क्लिक करा.
4. यानंतर तुमच्या समोर एक मेसेज पॉपअप होईल, ज्यामध्ये तुम्हाला चेंज आणि कॅन्सलचा पर्याय दिसेल. तुम्ही चेंज वर क्लिक करून पुढे जा.
5. आता तुम्हाला नवीन नंबर सबमिट करण्याचा पर्याय दिसेल. नंबर टाकल्यानंतर, वरच्या उजव्या बाजूला टिक (बरोबर) चिन्हावर क्लिक करा.
6. यानंतर टेलिग्रामवरून तुमच्या फोनवर एक कन्फर्मेशन कोड येईल. तुम्ही हा कोड टाकल्यानंतर तुमचा नंबर अपडेट केला जाईल.