एकदा पाहाल तर प्रेमात पडाल; Moto चा बजटमधील भन्नाट 5G फोन

Motorola ने नुकताच एक नवीन 5G स्मार्टफोन Moto G71s लॉन्च केला आहे. Moto G सिरिजमधील या नवीन फोनचा डिस्प्ले 120hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो Snapdragon 695 Soc ने सुसज्ज आहे. 

Updated: May 20, 2022, 12:14 PM IST
एकदा पाहाल तर प्रेमात पडाल; Moto चा बजटमधील भन्नाट 5G फोन title=

मुंबई : Motorola ने नुकताच एक नवीन 5G स्मार्टफोन Moto G71s लॉन्च केला आहे.  Moto G सिरिजमधील या नवीन फोनचा डिस्प्ले 120hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो Snapdragon 695 Soc ने सुसज्ज आहे. 

Moto G71s 5G 128GB इनबिल्ट स्टोरेजसह सुसज्ज आहे. याशिवाय त्याच्या खास वैशिष्ट्यांमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि डॉल्बी अॅटम्सचा सपोर्ट देखील आहे.

फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देखील देण्यात आली आहे. Moto G71 5G पूर्वी युरोपमध्ये लॉन्च करण्यात आला होता जेथे त्याची किंमत EUR 299.99 होती जी सुमारे 25,200 रुपये आहे. 

हा फोन भारतात 6GB + 128GB रॅम स्टोरेज वेरिएंटसाठी 18,999 रुपयांना सादर करण्यात आला होता.

Moto G71s 5G च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत सुमारे 19,500 रुपये आहे. हा फोन स्टार ब्लॅक आणि हाओयु कलर पर्यायांमध्ये येतो. 

येथे Moto G71s 5G ची संपूर्ण वैशिष्ट्ये

नव्याने लाँच झालेल्या Moto फोनमध्ये 20:9 आस्पेक्ट रेशो, DC डिमिंग सपोर्ट आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे.

कॅमेरा: 

50MP प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 121 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू, 2 MP मॅक्रो शूटर यांचा समावेश असलेला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे .

सेल्फीसाठी फोनमध्ये 16 एमपी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फोनला नाईट मोड, पोर्ट्रेट मोड, मॅक्रो मोड आणि स्पॉट कलर मोड असे वेगवेगळे कॅमेरा मोड देण्यात आले आहेत.

बॅटरी: 

Moto च्या नवीन लाँच झालेल्या फोनमध्ये जलद चार्जिंग सपोर्ट आहे आणि 5000mAH बॅटरी आहे.