वेळेआधीच लॉंच होणार Google चा स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

गुगलच्या मोबाईल फोन आपल्या विशेष फीचर्ससाठी ओळखले जातात. त्यामुळेच या फोनची बाजारात मागणी आहे.

Updated: Aug 8, 2021, 08:43 AM IST
वेळेआधीच लॉंच होणार Google चा स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स title=
मुंबई : गुगलचे मोबाईल फोन आपल्या विशेष फीचर्ससाठी ओळखले जातात. त्यामुळेच या फोनची बाजारात मागणी आहे. ग्राहकांना या फोनची प्रतिक्षा असते. गुगलचा स्मार्ट फोन वर्षाच्या शेवटी बाजारात येण्याची चर्चा होती. परंतु हा स्मार्टफोन आता याच महिन्यात लॉंच होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
 
किंमत किती असेल
गुगलच्या pixe15A या स्मार्टफोनची ग्राहकांना प्रतिक्षा आहे. हा स्मार्टफोन बजेट फोन्सच्या कॅटेगरीत येतो. वर्षाच्या शेवटी नाही तर, 23 ऑगस्टलाच हा फोन लॉंच होण्याची शक्यता आहे. या फोनची रेज 450 डॉलर्स म्हणजेच 33,500 रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.
 
या किंमतीसोबत गुगल पिक्सल 5 ए काहीच दिवसांपूर्वी लॉंच झालेले 5 G फोन्सला टक्कर देणार आहे. हा फोन केवळ गुगलच्या फिजिकल आऊटलेस्ट आणि गूगलच्या ऑनलाईन स्टोअर्सवरच खरेदी करता येईल.
 
फीचर्स
या फोनमध्ये 6.4 इंचाचा फुल HD प्लस डिस्प्ले, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765 चिपसेट, 6 GB R AM, 4650 mAh Battery,12.2 MP-16MP Camera असण्याची शक्यता आहे.