Samsung | फक्त 2000 रुपयांत करा सॅमसंग गॅलेक्सीची प्री बुकिंग; प्रतिस्पर्धी कंपन्यांना तगडी टक्कर

सॅमसंगच्या ग्राहकांना येणाऱ्या सॅमसंग गॅलक्सी फोनची प्री-बुकिंग करता येणार आहे.

Updated: Aug 7, 2021, 12:04 PM IST
Samsung | फक्त 2000 रुपयांत करा सॅमसंग गॅलेक्सीची प्री बुकिंग; प्रतिस्पर्धी कंपन्यांना तगडी टक्कर title=

मुंबई : सॅमसंगच्या ग्राहकांना येणाऱ्या सॅमसंग गॅलक्सी फोनची प्री-बुकिंग करता येणार आहे. भारतात ग्राहक आता येणाऱ्या गॅलक्सी फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची 2 हजार रुपये टोकन मनी देऊन प्री-रिजर्व करू शकतात. वापरकर्ते सॅमसंग इंडियाच्या  ई-स्टोअरच्या  www.samsung.com या संकेतस्थळावर ही रक्कम  जमा करता येईल. कंपनीने म्हटले आहे की, प्री बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना नेक्स्ट गॅलक्सी व्हीआयपी पास मिळेल. ज्यामध्ये ग्राहकांना डिवाइसची प्री बुकिंग केल्यास 2,699 रुपयांचा स्मार्ट टॅग मोफत मिळेल.

फक्त 2 हजार रुपयांत प्री बुकिंग
ग्राहकांनी 2 हजार रुपयांची प्री बुकिंग केल्यास नंतर डिवाइसच्या किंमतीसोबत ती रक्कम एडजस्ट केली जाईल. 11 ऑगस्ट रोजी दक्षिण कोरियाची दिग्गज सॅमसंग कंपनी  नवीन स्मार्टफोन लॉंच करणार आहे. यामध्ये Samsung Galaxy Z Fold 3 और Galaxy Z Flip 3  याफोल्डेबल डिवाइसचा सामावेश असणार आहे.

सॅमसंगच्या फोल्डेबल फोन्सची अनेक दिवसांपासून मोठी मागणी आहे. कंपनी आपल्या स्मार्टफोनला अनपॅक्ड इवेंटमध्ये प्रदर्शित करणार आहे. 11 ऑगस्टला होणाऱ्या इवेंटमध्ये Samsung Galaxy Z Fold 3 सोबतच Z Flip 3, सॅमसंग गॅलक्सी वॉच 4 आणि सॅमसंग गॅलक्सी वॉच एक्टिव 4 लॉंच होण्याची शक्यता आहे.  Z Fold 3 ची किंमत 1 लाख 35 हजार रुपये आहे. तसेच Galaxy Z Flip ची किंमत 80 हजार रुपयांपासून ते 90 हजार रुपयांपर्यंत आहे.