Electric vehicle : ईलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुंबईत आता ही सुविधा

Electric vehicle News : मुंबईत 330 नवे ई-चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. त्यामुळे ईलेक्ट्रिक वाहन वापरणं आणखी सुखकर होणार आहे.

Updated: Jan 5, 2023, 12:22 PM IST
Electric vehicle : ईलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुंबईत आता ही सुविधा title=

Mumbai News : मुंबईत ईलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. (Mumbai News in Marathi) येत्या दोन महिन्यांत मुंबईत 330 नवे ई-चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. (330 new e-charging stations in Mumbai) या स्टेशनवर सर्व प्रकारच्या गाड्यां चार्ज होऊ शकतात. त्यामुळे ईलेक्ट्रिक वाहन वापरणं आणखी सुखकर होणार आहे.

मुंबईत 330 चार्जिंग स्टेशन उभारणार

मुंबईतल्या 26 भागांमध्ये ही 330 चार्जिंग स्टेशन उभारलं जाणार आहेत. ईलेक्ट्रिक वाहनांसाठी पुरेसे चार्जिंग स्टेशन नसल्याने पेट्रोल-डिझेलच्या वाहन खरेदीला अजूनही पसंती मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना घराच्या जवळ, किंवा आसपासच्या परिसरात चार्जिंग करणं सोप व्हावं यासाठी बेस्टने ई चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम हाती घेतले आहे.

सर्व वाहनांना चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध होणार

मुंबईतील हवेची पातळी सातत्याने खालावली आहे. दिल्ली पेक्षा जास्त प्रदूषण हे आता मुंबईत दिसून येत आहे.  गेल्या काही दिवसांपासून हवेचा निर्देशांक 310 एक्यूआय नोंदवण्यात आला आहे. मुंबईत सातत्याने होणारी बांधकामे, खाणकामे, शिवाय कारखान्याचा धूर, वाहनातून निघणार वायू यामुळे प्रदूषण निर्माण होत आहे. याचा परिणाम सातत्याने हवेचे प्रदूषण वाढवण्यावर होत आहे. 

मुंबईत वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे  प्रदुषणात मोठी भर पडत आहे. त्यामुळे प्रदूषण मुक्त मुंबईसाठी आता भर देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून  ई-वाहन खरेदीला प्रोत्साहन मिळावे म्हणून मुंबईत ई-चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. त्यानुसार तीन चाकी, चार चाकी, व्हॅन, बस अशा सर्व वाहनांना चार्जिंग करण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. बेस्ट बसेसह ही केंद्रे सार्वजनिक वापरासाठीदेखील खुली असतील. 

या  charging stations वर माफक दरात वाहन चार्ज करता येणार आहे, अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली. बोरिवली नॅन्सी कॉलनीतील एसटी थांब्यासह रेल्वे स्थानक परिसरात चार्जिंग स्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरु आहे.

मुंबईत ही सुविधा कुठे मिळणार आहे?

मुंबईत प्रामुख्याने e-charging stations ही कुलाबा, मुंबई सेंट्रल, वरळी, वडाळा, वांद्रे, सायन प्रतीक्षा नगर, धारावी, महेश्वरी उद्यान, सांताक्रूझ, देवनार, शिवाजी नगर, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड, कुर्ला, मरोळ, दिंडोशी, मागाठाणे, गोरेगाव, ओशिवरा, मालवणी, पोईसर, गोराई, मालाड, बॅकबे आणि आणिक अशा एकूण 26 आगारांत एकूण 330 चार्जिंग स्टेशन (charging stations) उभारण्यात येणार आहेत.