एका मिनिटात Whatsapp, Email आणि Google वर काय होतं? पाहा...

डिजीटल क्रांती झाल्यापासून आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मोठा बदल झालाय.   

Updated: Aug 8, 2021, 07:35 PM IST
एका मिनिटात Whatsapp, Email आणि Google वर काय होतं? पाहा... title=

मुंबई : डिजीटल क्रांती झाल्यापासून आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मोठा बदल झालाय.  तुमच्या आमच्यासह प्रत्येक जण हा मोबाईलमध्येच गुंतेलेला असतो. प्रत्येक जण  कामानानिमित्ताने तसेच पर्सनल चॅट, मेसेज, ईमेल्स करत असतो. एका मिनिटाने असा काय फरक पडतोय, असं आपण सर्रासपणे म्हणतो. पण या एका मिनिटाची मोठी  महती आहे. तुम्ही कधी विचार केलाय का, की इंटरनेटच्या माध्यमातून एका मिनिटात किती मेसेज आणि इमेल्स केले जात असतील. हा आकडा समजल्यावर तुम्हीही चकीत व्हाल. (do you know what happen only 1 minute on internet, know details)   

Whatsappवरुन मिनिटाला किती मेसेज? 

चॅटिंगसाठी Whatsapp मोठ्या प्रमाणात वापरला जातो. व्हॉट्सएपवरुन एका मिनिटात चक्क 4 कोटी 1 लाख मेसेज केले जातात. का, आकडा जाणून धक्का बसला ना? आपण मित्रांसोबत Whatsapp वर बोलताना सहजपणे 100 मेसेजेस करतोच. त्यामुळे जगभरात एका मिनिटात इतके मेसेज होत नसतील, याबाबत शंका उपस्थित करण्याला वावच नाही. विशेष म्हणजे दरवर्षी 31 डिसेंबरच्या रात्री व्हॉट्सएप  सर्वात जास्त बिजी असतं. या दिवशी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. 
 
इमेलचा आकडा किती?

आता इमेलचे आकडे पाहुयात. ऑफीस तसेच वैयक्तिक कामाच्या निमित्ताने आपण मेल करत असतो. हे मेल आपण जीमेल, आऊटलूक, याहू, हॉटमेल या लोकप्रिय इमेल सर्व्हिसच्या माध्यामातून करतो. या सर्व माध्यमातून दर एका मिनिटाला तब्बल 18 कोटी मेल केले जातात.

एका मिनिटात लाखो रुपयांची कमाई

कोरोना काळात ऑनलाईन शॉपिंगला मोठ्या प्रमाणात पसंती देण्यात आली. तसेच त्याआधी आणि आताही मोठ्या प्रमाणात ऑनलाईन शॉपिंग केली जाते. दरम्यान या इ शॉपिंग वेबसाईटच्या माध्यामातून  दर मिनिटात 10 लाखांची खरेदी केली जाते.

गूगल सर्च किती?

दिवसभरात आपल्याला अनेक प्रश्न पडतात. अशा वेळेस आपण हक्काने गूगलचा वापर करतो. गूगलही आपल्या सर्व प्रश्नांवर समाधान देतो. गूगलवर एका मिनिटात चक्क 38 लाख सर्च केले जातात. म्हणजेच एकाचवेळी एका मिनिटात 38 लाख सर्च केले जातात. विशेष म्हणजे इतका लोड असूनही सर्वर क्रॅश होत नाही.

मिनिटात किती APP Download? 

प्ले स्टोअरवरुन आपल्याला हवे असलेले  App डाऊनलोड करता येतात. गूगल प्ले स्टोअरवरुन मिनिटात 3 कोटी 90 लाख App डाऊलोड केले जातात.

फेसबूक (Facebook) 

आता वळूयात (Facebook)  फेसबूककडे. फेसबूक वरुन दर मिनिटाला म्हणजेच 60 सेकंदात 10 लाख लॉगीन केलं जातं. तर इंस्टाग्रामवर दर मिनिटाला 3 लाख 47 हजार 222 फोटो अपलोड केले जातात.  

यूट्यूब

आता यूट्युबची आकडेवारी पाहुयात. यूट्यूबवर 60 सेकंदात 45 लाख व्हीडिओ पाहिले जातात.