या '३' ट्रीक्सने ओळखा तुम्हाला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलंय !

व्हॉट्सअॅप हे भारतातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 26, 2017, 04:07 PM IST
या '३' ट्रीक्सने ओळखा तुम्हाला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलंय ! title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : व्हॉट्सअॅप हे भारतातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. या अॅपने अनेक गोष्टी सोप्या केल्या. सतत संपर्कात राहणे किंवा संपर्क साधणे सोपे झाले आहे.  पण काही वेळेस भांडण, गैरसमज किंवा एखाद्या क्रमांकावरून त्रासदायक मेसेज येऊ लागले की युजर्स तो क्रमांक ब्लॉक करतात. यासाठी व्हॉट्सअॅपमध्ये ‘कॉन्टॅक्ट ब्लॉक’चा पर्याय देखील उपलब्ध आहे. 
ब्लॉक केलेल्यांची यादी आपल्याला व्हॉट्सअॅपमधील सेटिंगच्या माध्यमातून पाहता येते. पण एखाद्या व्यक्तीने आपल्याला ब्लॉक केलं आहे, हे आपल्याला कळत नाही. पण काही सोप्या गोष्टींच्या साहाय्याने तुम्हाला त्या व्यक्तीने ब्लॉक केलं आहे, हे सहज ओळखता येईल. अशा काही गोष्टी जाणून घेऊया :
१. खाद्या व्यक्तीने व्हॉट्स अॅपवर ब्लॉक केल्यास तुम्हाला त्याचा फोटो, स्टेटस किंवा लास्ट सीन दिसत नाही. पण काही वेळेस प्रायव्हसी सेटिंग्स मध्ये बदल केल्याने देखील युजर्सचा फोटो, स्टेटस किंवा लास्ट सीन दिसत नाही. ही बाब लक्षात घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. 
२. व्हॉट्स अॅपवर मेसेज केल्यानंतर दोन टिक येतात. परंतु, एखाद्या व्यक्तीने ब्लॉक केले असल्यास त्या व्यक्तीला मेसेज जात नाही आणि दोन ऐवजी एकच टिक दिसते. कदाचित त्या व्यक्तीचा मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे किंवा नेटवर्कमुळेही त्याला मेसेज न जाण्याची शक्यता असते. पण फोटो, स्टेटस, लास्ट सीन न दिसणे आणि मेसेज केल्यानंतर फक्त एक टिक दिसली तर मात्र संबधित व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केल्याची शक्यता अधिक असते.
३. जर त्या व्यक्तीला तुमच्या नंबरवरून व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉल जात नसतील तर त्या व्यक्तीने तुमचा नंबर ब्लॉक केला आहे, असं समजावं.