नवी दिल्ली : स्मार्टफोन आणि टॅब बनवणारी कंपनी स्वाईप टेक्नोलॉजीने भारतीय बाजारात स्वस्त दरात एक स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा ड्युल सिम स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाईट शॉप-क्लूजवर उपलब्ध आहे. या फोन ब्लॅक, गोल्ड आणि सिल्वर रंगात मिळेल. याव्यतिरिक्त एलीट ड्युलमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. याची किंमत ३९९९ रुपये आहे.
५ इंचाचा डिस्प्ले असलेल्या स्वाईपच्या नव्या फोनमध्ये क्वाड-कोर प्रोसेसर दिलेला आहे. यात १.३ गीगा हर्टजचा क्वॉड-कोर मीडियाटेक प्रोसेसर आहे. यात सर्वाधिक क्लॉड स्पीड १.३ गीगाहर्ट्ज आहे. अॅनरॉईड ७.० नूगावर काम करणारा हा फोन स्कॅच रजिस्टेंट आहे.
या फोनमध्ये 1 GB रॅम आहे. तर 8 GB चा इंटरनल स्टोरेज आहे. यात मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून 64 GB पर्यंत तुम्ही मेमरी वाढवू शकता. हा फोन अगदी जलद रन होतो, असा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे वापरताना युजर्सना कोणताही त्रास होणार नाही.
फोनमध्ये 3000 mAh ची बॅटरी आहे. याचा सेल्फी कॅमेरा ५ मेगापिक्सलचा असून फ्लॅशसहीत आहे. याशिवाय फोनच्या रिअर पॅनलवर ८ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
या फोनची किंमत ३९९९ रुपये आहे. पण जिओ फुटबॉल ऑफरच्या अंतर्गत हा फोन खरेदी केल्यास यावर २,२०० रुपयांचा जिओ कॅशबॅक मिळेल. फोनच्या लॉन्चिंगच्या प्रसंगी स्वाईप टेक्नोलॉजीचे फाऊंडर व सीईओ श्रीपाल गांधीने सांगितले की, ग्राहकांच्या मागण्या लक्षात घेऊन हा फोन लॉन्च केला आहे. हा बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त ड्युअल कॅमेरा स्मार्टफोन आहे.