Jeep कंपनीकडून Anniversary Edition बुकिंगला सुरुवात, जाणून घ्या फीचर्सबाबत

यंदा भारतामध्ये पाच वर्षे पुर्ण केल्यामुळे पॉप्युलर एसयूवी जीप कंपासची निव्हरसरी एडिशन बुधवारी लाँच केली आहे. कंपनीने या कारची बुकिंग सुरु केली आहे. 

Updated: Aug 10, 2022, 08:04 PM IST
Jeep कंपनीकडून Anniversary Edition बुकिंगला सुरुवात, जाणून घ्या फीचर्सबाबत title=

2022 Jeep Compass Anniversary Edition Launch : दिग्गज ऑटो ब्रँड असलेली जीप (JEEP) यंदा भारतामध्ये पाच वर्षे पुर्ण केल्यामुळे पॉप्युलर एसयूवी जीप कंपासची निव्हरसरी एडिशन बुधवारी लाँच केली आहे. कंपनीने या कारची बुकिंग सुरु केली आहे. कंपनीच्या डिलरशिप किंवा अधिकृत वेबसाईटला (Jeep India website) भेट देऊन या एक्सयूव्ही कारला बुक करु शकता.

या नवीन स्पेशल एडिशन मॉडेलमध्ये अनेक स्पेशल फीचर्स आहेत जे या कारला आणखी खास बनवतात. अ‍ॅडव्हांस सेफ्टी आणि टेक्नोलॉजी असलेल्या लेस जीप कंपासमध्ये सॅटिन क्रिस्टल लोअर प्रावरणी, बॉडी-कलर्ड क्लॅडिंग, एक्सेंट कलर रुफ रेल्स, 18 इंच ग्रेनाईट क्रिस्टल फिनिश अलॉय व्हील आणि इतर अनेक खास फीचर्स आहेत.

जीप कंपासच्या अ‍ॅनिव्हरसरी एडिशनचं इंजिन

जीप कंपासच्या अ‍ॅनिव्हरसरी एडिशनचं (2022 Jeep Compass Anniversary Edition) इंजिन दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. एक म्हणजे 1.4 लिटर मल्टीएअर पेट्रोल(7 स्पीड डीडीसीटी एटी) आणि दुसरं म्हणजे 2.0 लिटर मल्टीजेट डिझेल (6 स्पीड एमटी) 4X2 कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. 

एसयूव्हीमध्ये हे आहे खास

जीप कंपासच्या अ‍ॅनिव्हरसरी एडिशनमध्ये (2022 Jeep Compass Anniversary Edition) ग्रेनाईट क्रिस्टल फिनिशसोबत 18 इंचचे अलॉय व्हिल, 5 वी अ‍ॅनिव्हरसरी बॅग, लाईट टंगस्टन एक्सेंट स्टिचिंगचे लेदर सीट्स, अ‍ॅटोमॅटिक डिम रीअरव्यू इंटेरिअर मिरर, पियानो ब्लॅक आणि अॅनोडाइज्ड गन मेटल इंटेरिअर एक्सेंट, ब्लॅक डेडलाईनर, न्यूट्रल ग्रे एक्सेंट बॅजिंगसोबतच बाहेर मिरर आणि न्यूट्रल ग्रे रिंगसोबत नवी ग्लॉस ब्लॅक ग्रिल, बॉडी कलर फेंडर फ्लेअर्स, ब्लॅक डे लाईट ओपनिंग मोल्डिंग, बॉडी कलर्ड सिल मोल्डिंग आणि क्लॅडिंग अ‍ॅक्सेंट कलर रुफ रेल्स देखील उपलब्ध आहे. 

 

2017 ला झाली होती सुरुवात

भारतात जीप कंपास (Jeep Compass) एक्सयूव्ही पाच वर्षे पुर्ण केल्याच्यानिमित्ताने, जीप ब्रँड इंडियाचे प्रमुख निपुण जे महाजन यांनी असं सांगितलंय की, 'जीप कंपास एक प्रतिष्ठित एसयू्व्ही आहे. या कारने अनेकांच्या हृदयावर राज्य केलंय. ही कार ऑफ रोडिंगला प्रोत्साहन देते. जीप कंपासने 2017 ला सुरुवात केल्यानंतर कारची डिझाईन, परफॉर्मंस, पावर आणि विश्वासहर्ता या सर्व घटकांमध्ये उंची गाठली आहे.'