सिमकार्डमध्ये करा हा छोटासा बदल आणि मिळवा High Speed Internet, जाणून घ्या प्रोसेस

तुम्हाला आज आम्ही काही साध्या स्टेप्स सांगणार आहोत. यामुळे तुमच्या स्मार्टफोनमधील इंटरनेटचा स्पीड वाढेल.

Updated: Aug 10, 2022, 07:56 PM IST
सिमकार्डमध्ये करा हा छोटासा बदल आणि मिळवा High Speed Internet, जाणून घ्या प्रोसेस title=

Boost Internet Speed: प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्टफोन पाहायला मिळतो. या स्मार्टफोनचा इंटरनेट हा आत्मा आहे. इंटरनेटशिवाय महागडा फोन देखील काहीच कामाचा नाही. त्यामुळे चांगलं नेटवर्क असलेलं सिमकार्ड घेण्याकडे कल असतो. पण कधी कधी चांगल्या नेटवर्कचं कार्ड घेऊन देखील हवा तसा स्पीड मिळत नाही. व्हिडीओ पाहताना सारखं सारखं बफर होत असल्याने मध्येच बंद करावा लागतो. दुसरीकडे चुटकीसरशी होणारी कामं देखील रखडतात. तुमच्या स्मार्टफोनमध्ये सुद्धा इंटरनेटचा स्पीड हवा तसा मिळत नसेल. तुम्हाला आज आम्ही काही साध्या स्टेप्स सांगणार आहोत. यामुळे तुमच्या स्मार्टफोनमधील इंटरनेटचा स्पीड वाढेल. व्हिडीओ पाहण्यापासून ते डाऊनलोडिंग वेगाने होईल.

आताच्या स्मार्टफोन ड्युअल सिमकार्ड स्लॉट असतात. त्यामुळे आपल्याला वाटेल त्या स्लॉटमध्ये सिमकार्ड टाकलं जातं. पण यामुळे तुमच्या इंटरनेट स्पीडवर परिणाम होतो. कदाचित तुम्हाला ही बाब पटणार नाही. पण तुम्ही ज्या सिमकार्डचं नेट वापरता ते सिमकार्ड एक नंबरच्या स्लॉटमध्ये ठेवा. कार्ड या सिम स्लॉटमध्ये टाकल्यावर इंटरनेट खूप वेगाने चालेल आणि कॉलिंग देखील सुरळीत होईल. 

सिमकार्ड स्लॉटमध्ये टाकल्यानंतर त्याची पोझिशन एक व्यवस्थितरित्या चेक करून घ्या. यामुळे किंचितसं जरी सिमकार्ड इकडे तिकडे झालं असेल तर ते सिमकार्ड व्यवस्थित रिड होणार नाही. त्यामुळे इंटरनेटची समस्या कायम राहते.  तुम्ही सिमकार्डची स्थिती तपासा आणि विशेष काळजी घ्या.

स्लो इंटरनेटची समस्या तुमच्या फोनमध्येच असू शकते. डिफॉल्ट सेटिंगमुळे तुमचा इंटरनेटचा वेग कमी होतो. यासाठी तुम्हाला नेटवर्क सेटिंग रिसेट करावी लागेल. प्रथम तुम्हाला Setting>> Mobile Network>> Network Operator>> Automatic >> Turn Off निवडा. यानंतर तुम्हाला मॅन्युअली नेटवर्क प्रोव्हाडर निवडावा लागेल.

Cache मुळे तुमच्या फोनचा इंटरनल स्टोरेज भरतो. त्यामुळे इंटरनेटचा स्पीड कमी होतो. जर तुम्ही तुमच्या फोनची कॅशे बर्‍याच दिवसांपासून क्लिअर ​​केलं नसेल, स्पीडवर परिणाम होईल. 

सध्याचे स्मार्टफोन मल्टी टास्किंग काम करतात. त्यामुळे इंटरनेट स्पीडवर परिणाम होतो. तुम्ही वापरत नसलेले अॅप्स बंद करा. कारण बॅकग्राउंडमध्ये चालणारे हे अॅप्स तुमचा इंटरनेट स्पीड कमी करू शकतात.