yuvraj singh

९ एप्रिल रोजी युवी परतणार मायदेशी

युवराजच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. युवराज सिंग ९ एप्रिल रोजी भारतात परतणार आहे. मायदेशी परतल्यावर युवराज ११ एप्रिलला पत्रकार परिषद घेणार आहे. अमेरिकेतील टेक्सास येथे युवराज याच्या कँसरवर गेले काही महिने उपचार चालू होते.

Apr 6, 2012, 12:45 PM IST

युवराज सिंग फिट

टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंगला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला....सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर युवराजनं ही माहिती दिली आहे. केमोथेरपीच्या उपचारांचा तिसरा आणि शेवटचा टप्पा पूर्ण झाला असल्याची माहिती युवीनं ट्विटरवर दिली आहे

Mar 18, 2012, 12:03 PM IST

युवीने केलं विराट कोहलीचं अभिनंदन

अमेरिकेमध्ये कँसरवर उपचार घेत असलेल्या युवराज सिंगने मंगळवारी विराट कोहलीचं अभिनंदन केलं आहे. विराट कोहली याने होबार्ट येथील वन-डे मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद १३३ धावा काढून भारताला विजय मिळवून दिला होता.

Feb 29, 2012, 10:28 AM IST

युवराज सिंगचा ट्युमर जवळपास नष्ट

भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी एक खूषखबर आहे. तुम्हाला हे ऐकून नक्कीच आनंद होईल की युवराज सिंग याचा ट्युमर आता जवळपास नष्ट झाला आहे. ही माहिती युवीने स्वतः ट्विटरवर दिली आहे. युवराजवर सध्या अमेरिकेतील बोस्टनमध्ये इलाज सुरू आहेत.

Feb 16, 2012, 01:08 PM IST

शेवटी केस गेले. पण, हिंमतीने जगतोय

टीम इंडियाचा ऑल राऊंडर युवराज सिंग याच्यावर सध्या अमेरिकेमध्ये फुप्फुसांच्या कॅन्सरवरील इलाज चालू आहेत. इलाजादरम्यान त्याने आपले नवे फोटो शुक्रवारी ट्विटरवर अपलोड केले आहेत. या फोटोमध्ये युवराजचं डोकं मात्र भादरलेलं आहे.

Feb 10, 2012, 11:31 AM IST

युवराजला कॅन्सर, अमेरिकेत किमोथेरपी

युवराज सिंगवर अमेरिकेत किमोथेरपी करण्यात आली आहे. युवराज सिंग 18 जानेवारीलाच उपचार घेण्यासाठी अमेरिकेला रवाना झाला होता. त्याचप्रमाणे युवराजचे फिजिओ जतिन चौधरी यांनी युवीला कॅन्सर झाल्याच सांगितलं आहे

Feb 7, 2012, 11:57 AM IST

युवराज करणार मेमध्ये मैदानावर ‘राज’!

अमेरिकेत केमोथेरपी घेत असलेला भारतीय स्टार बॅटसमन युवराज सिंग याला फुफुसांचा कॅन्सर नसून त्याच्या फुफुसांमध्ये एक ट्युमर आहे. हा ट्युमर काढणे शक्य आहे. त्यामुळे युवराज सिंग मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मैदानात खेळण्यास सज्ज होईल, असा विश्वास युवराजवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

Feb 6, 2012, 06:24 PM IST

युवराज सिंगला ट्युमरची लागण

युवराज सिंगला डाव्या फुप्फुसात ट्युमरची लागण झाली असल्यानेच त्याने वेस्ट इंडिज विरुध्दच्या एक दिवसीय सिरीजमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. युवराजने स्वत: आपण वेस्ट इंडिज विरुध्दच्या एक दिवसीय सिरीजसाठी उपलब्ध नसल्याचं जाही केलं आणि ऑस्ट्रेलियातील टेस्ट सिरीजसाठी संघात त्याचा समावेश करण्यात आला नाही.

Nov 26, 2011, 03:27 PM IST