युवराज सिंगला ट्युमरची लागण

युवराज सिंगला डाव्या फुप्फुसात ट्युमरची लागण झाली असल्यानेच त्याने वेस्ट इंडिज विरुध्दच्या एक दिवसीय सिरीजमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. युवराजने स्वत: आपण वेस्ट इंडिज विरुध्दच्या एक दिवसीय सिरीजसाठी उपलब्ध नसल्याचं जाही केलं आणि ऑस्ट्रेलियातील टेस्ट सिरीजसाठी संघात त्याचा समावेश करण्यात आला नाही.

Updated: Nov 26, 2011, 03:27 PM IST
 झी 24 तास वेब टीम, मुंबईयुवराज सिंगला डाव्या फुप्फुसात ट्युमरची लागण झाली असल्यानेच त्याने वेस्ट इंडिज विरुध्दच्या एक दिवसीय सिरीजमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. युवराजने स्वत: आपण वेस्ट इंडिज विरुध्दच्या एक दिवसीय सिरीजसाठी उपलब्ध नसल्याचं जाही केलं आणि ऑस्ट्रेलियातील टेस्ट सिरीजसाठी संघात त्याचा समावेश करण्यात आला नाही. वर्ल्डकपच्या दरम्यानच युवराजच्या आजारपणाने डोकं वर काढलं होतं आणि त्यानंतर तो इंग्लंडमध्ये फक्त एक टेस्ट खेळला.
रिपोर्ट आणि स्कॅननंतर युवराजचा आजार गंभीर असल्याचं निष्पन्न झालं. युवराजच्या डाव्य फुप्फुसात गोल्फ बॉलच्या आकाराचा गोळा असल्याचं आढळून आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला अधिक तपासणी करण्याचा सल्ला दिला. युवराजला लिमफोमा नावाचा अबनॉर्मल ट्युमर झाल्याचं रिपोर्टमध्ये निष्पन्न झालं. हा ट्युमर घातक ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.. इंग्लंडवरुन परतल्यानंतर तपासणी अंती योग्य औषध उपचार घेतल्यास ट्युमर बरा होऊ शकतो असं निदान झालं.