www.24taas.com, नवी दिल्ली
युवराजने सचिन तेंडुलकरनं लंडनमध्य़े घेतल्या भेटीमुळे आत्मविश्वास वाढला असल्याचही सांगितलं आहे. त्याचप्रमाणे सचिनच्या महासेंच्युरी प्रतीक्षा करत होतो असंही म्हटलं आहे. सचिन तेंडलकर युवराजचा प्रेरणास्त्रोत. सर्वोत्तम मित्र. भारतानं २०११चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर युवीनं हा वर्ल्ड कप सचिनसाठीच जिंकला असल्याच म्हटलं होतं.
वर्ल्ड कपपूर्वी युवराज आऊट ऑफ फॉर्म होता. मात्र, सचिननं त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे युवी वर्ल्डकपमध्ये पुढे भारतासाठी मॅचविनर ठरला. युवराज कॅन्सरशी लढत असतांना त्याच्यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत होता. आणि तेव्हा सचिननही युवीसाठी प्रार्थना करण्यात मागे नव्हता. इतकच नाही सचिननं लंडनमध्ये जाऊन युवराजची भेटही घेतली होती.
सचिनच्या भेटीमुळे युवराजचा आत्मविश्वास वाढला होता. त्यानंतर युवराजनं कॅन्सरविरुद्धची लढाईही जिंकली देखील.या लढाईत सचिनकडून मिळालेला धीर युवीसाठी मोलाचा ठरला.