बाळ चोरणाऱ्या पती-पत्नींना अटक
तीन महिन्याचं बाळ चोरणा-या पती-पत्नीला स्वारगेट पोलिसांनी अटक केलीय. हे बाळ विकत घेणा-या 2 जणांना ताब्यात घेण्य़ात आलंय. तसंच अपहरण झालेल्या तीन महिन्याच्या बाळाचीही सुखरूप सुटका करण्यात आलीय.
Nov 3, 2013, 10:15 PM ISTपुण्यात महिला पोलिसाची पतीनं केली हत्या
पुण्यात एका महिला पोलीस कॉन्स्टेबलची तिच्या पतीनंच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. विशेष म्हणजे हे दोघंही पोलीस विभागात कार्यरत होते. रुपाली साळवी असं मृत महिलेचं नाव असून तिचा पती श्रेयस साळवी याला पोलिसांनी अटक केलीय.
Oct 20, 2013, 02:04 PM ISTआमदाराच्या पत्नीची हत्या
उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाचे आमदार हाजी अलीम यांच्या पत्नीची आज सकाळी दिल्लीत त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. चाकूसारख्या धारदार शस्त्राने ही हत्या केली गेल्याची शंका व्यक्त होत आहे.
Oct 9, 2013, 08:23 PM ISTअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही बायकोचा धाक!
जगातील सर्वांत सामर्थ्यवान व्यक्ती मानल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी बायकोच्या धाकामुळं सिगारेट सोडावी लागल्याचं स्पष्ट झालंय. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या पार्श्वाभूमीवर एका कार्यक्रमात बोलताना ओबामा यांची ही कबुली त्यांच्या समोरील मायक्रोफोनवर ध्वनिमुद्रित झाली!
Sep 24, 2013, 12:01 PM IST`एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे पत्नीशी क्रूरता नाही`
‘एखादा पती आपल्या पत्नीव्यतिरिक्त इतर महिलेबरोबर संबंध जवळीक वाढवित असेल तर त्या व्यक्तीवर बायकोशी क्रूरपणे वागल्याचा आरोप सिद्ध होत नाही’ असं एका प्रकरणाचा निर्णय सुनावताना सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.
Sep 10, 2013, 03:17 PM ISTपतीसोबत झोपल्यास पत्नीला होणार कैद
ब्रिटनमध्ये न्यायालयात एक आश्चर्यकारक आदेश देण्यात आला आहे. एका भारतीय महिलेलातिच्या पतीसोबत न झोपण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. जर ती आपल्या पतीसोबत झोपली, तर तिला तुरुंगात टाकण्याचा इशाराही कोर्टाने दिला आहे.
Aug 8, 2013, 05:55 PM ISTहुंड्यासाठी पत्नीला केलं मित्रांच्या हवाली
पत्नीकडून हुंडा मिळाला नाही म्हणून पतीनं तिला आपल्या तीन मित्रांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना शहापूर तालुक्यातल्या खर्डी गावात घडलीय.
Jul 31, 2013, 04:38 PM ISTहुंड्यासाठी न्यायाधीशाने केली पत्नीची हत्या!
लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण’ ही म्हण गुडगावमधील एका न्यायाधीशला पुरेपूर लागू पडतेय. जिथे लोकाना न्याय मिळतो त्या ठिकाणच्या एका न्यायाधीस सेवकांने कायद्याला लाजवेल असे काम केलेय.
Jul 20, 2013, 12:55 PM ISTघटस्फोट : पत्नीला पतीच्या `वडिलोपार्जित` संपत्तीतही वाटा!
लग्न आणि घटस्फोटासंदर्भातले कायदे विशेषतः महिलांच्या दृष्टीनं सुटसुटीत होणार आहेत. घटस्फोट घेताना पतीच्या वडिलोपार्जित संपत्तीतही पत्नीला वाटा मिळू शकेल.
Jul 18, 2013, 09:10 AM ISTअल्पवयीन मुलीवर पत्नीच्या मदतीने बलात्कार!
औरंगाबाद येथे २१ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली हे. धक्कादायक बाब म्हणजे यासाठी त्याच्या पत्नीनेच त्याला मदत केली.
Jul 16, 2013, 06:35 PM ISTपत्नी बेपत्ता; विरहात मंत्र्यानं सोडला प्राण
हरियाणाचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तेजेंद्र पाल मान यांचं रविवारी रात्री उशीरा दिल्लीमध्ये निधन झालंय.
Jul 16, 2013, 10:47 AM ISTआपल्या पत्नीचीही ब्ल्यू फिल्म बनवणारा नराधम अटकेत
ब्ल्यू फिल्म तयार करून विकणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश नागपुरात झाला असून आणि या प्रकरणात धर्मेंद्र जैन नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. महत्वाचे म्हणजे जैन नावाच्या या आरोपी नराधामाने आपल्या पत्नीची देखील अश्लील ब्लू फिल्म काढली.
Jul 1, 2013, 09:43 PM ISTपत्नीला पोटगी न मिळ्ल्यास जेलची हवा
न्यायालयाने ठरवून दिलेली पोटगीची रक्कम देण्यास नकार देणाऱ्या अथवा ही रक्कम देण्यास अपयशी ठरणाऱ्या पतीला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला.
Apr 10, 2013, 12:53 PM ISTगॅस संपल्याने पत्नीने पतीलाच गोळी घातली
गॅस सिलिंडरचा कोठा कमी झालाय. त्यातच संतापाची बाब म्हणजे सिलिंडरचे दरही वाढविले गेलेय. आता या महागाईत गृहिणीही होरपळून निघाल्यात. गॅस संपल्याने पत्नीचा पाराच चढला आणि तिने थेट पतीला गोळी घातली. यात पतीचा मृत्यू झाल्याची घटना इंदौरमध्ये घडलीय.
Feb 20, 2013, 05:47 PM ISTपतीच्या मृतदेहावर `ती` भाजत होती तंदूर
महिलांवरील अत्याचारांच्या घटना वारंवार समोर येत असताना महिलांकडून पुरूषांवर होणाऱ्या अत्याचारांच्याही घटना पुढे आल्या आहेत. पंजाबमध्ये एका पत्नीने आपल्या नवऱ्याचा खून करून त्याचा मृतदेह आंगणात पुरला आणि त्यावर पुढे तीन महिने ती तंदूर भाजत होती.
Jan 22, 2013, 04:28 PM IST