www.24taas.com, इंदौर
गॅस सिलिंडरचा कोठा कमी झालाय. त्यातच संतापाची बाब म्हणजे सिलिंडरचे दरही वाढविले गेलेय. आता या महागाईत गृहिणीही होरपळून निघाल्यात. गॅस संपल्याने पत्नीचा पाराच चढला आणि तिने थेट पतीला गोळी घातली. यात पतीचा मृत्यू झाल्याची घटना इंदौरमध्ये घडलीय.
घरातील गॅस संपल्यने १९ वर्षीय पत्नीने २९ वर्षीय पतीला गॅस आणण्याचा तगादा लावला. मात्र, पतीने दुर्लक्ष केल्याने त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. पत्नीने गावठी बंदुकीची गोळी पतीवर चालविली. यात पती आसिफ जखमी होवून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी नाजिया उर्फ सोनू हिला अटक केलीय.
१९ फेब्रुवारी रोजी रात्री जेवण करताना गॅस संपला. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. पत्नी नाजिया हिने गावठी बंदुक घेवून पती आसिफवर गोळी झाडली. त्याला तात्काळ हॉस्पिटलला हलविण्यात आले. जखमी झालेल्या आसिफची स्थिती नाजूक झाली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, पत्नीची चौकशी केल्यानंतर समजले की पती आसिफ हा बायकोला नेहमी शिव्या देऊन मारहाण करीत असे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.