www.24taas.com , झी मीडिया, न्यूयॉर्क
जगातील सर्वांत सामर्थ्यवान व्यक्ती मानल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी बायकोच्या धाकामुळं सिगारेट सोडावी लागल्याचं स्पष्ट झालंय. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या पार्श्वाभूमीवर एका कार्यक्रमात बोलताना ओबामा यांची ही कबुली त्यांच्या समोरील मायक्रोफोनवर ध्वनिमुद्रित झाली!
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आज बायकोच्या भीतीमुळं धुम्रपान सोडल्याचं मान्य केलंय. या कार्यक्रमात बोलताना समोरील एका व्यक्तीस धुम्रपानासंदर्भात ओबामा यांनी प्रश्नल विचारला. यानंतर ओबामा यांनी यावर बोलताना “गेल्या सहा वर्षांमध्ये मी धुम्रपान केलेलं नाही. माझ्या बायकोची मला वाटणारी भीती हे यामागचं कारण आहे!,``असं ओबामा म्हणाले.
आपल्या आरोग्यपूर्ण जीवनशैलीविषयी प्रसिद्ध असलेल्या ओबामा यांचा सिगारेट हा वीक पॉईंट मानला जातो. अमेरिकेची सूत्रं हाती घेतल्यानंतर पहिल्या वर्षी धुम्रपानाची सवय ९५ टक्के सुटल्याचं ओबामा यांनी सांगितलं होतं. ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा या सार्वजनिक आरोग्य मोहिमेबद्दल आग्रही असून आपल्या पतीच्या धुम्रपानाच्या सवयीबद्दल त्यांनी जाहीरपणे नापसंती व्यक्त केली होती! त्यामुळंच ओबामांनी सिगारेट सोडल्याचं कबुल केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.