`एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे पत्नीशी क्रूरता नाही`

‘एखादा पती आपल्या पत्नीव्यतिरिक्त इतर महिलेबरोबर संबंध जवळीक वाढवित असेल तर त्या व्यक्तीवर बायकोशी क्रूरपणे वागल्याचा आरोप सिद्ध होत नाही’ असं एका प्रकरणाचा निर्णय सुनावताना सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 10, 2013, 03:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘एखादा पती आपल्या पत्नीव्यतिरिक्त इतर महिलेबरोबर संबंध जवळीक वाढवित असेल तर त्या व्यक्तीवर बायकोशी क्रूरपणे वागल्याचा आरोप सिद्ध होत नाही’ असं एका प्रकरणाचा निर्णय सुनावताना सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत पतीची इतर महिलेसोबत जवळीक पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करेपर्यंत वाढत नाही तोपर्यंत पती आपल्या पत्नीशी क्रूरतेनं वागल्याचा दावा दाखल केला जाऊ शकत नाही. न्यायाधीश के. एस. राधाकृष्णन आणि न्यायाधीश पी.सी.घोषे यांच्या खंडपीठाच्या म्हणण्यानुसार, पत्नीला आपल्या पतीकडून दिली जाणारी वर्तवणूक आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी असेल तर आयपीसीच्या कलम ४९८ ए नुसार त्याच्यावर दावा दाखल केला जाऊ शकतो. यामध्ये तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.
लग्नानंतर पतीनं इतर महिलेसोबत जवळीक वाढविली आणि तो वैवाहिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात असफल ठरला तर याचा अर्थ तो पत्नीसोबत क्रूरतेनं वागतो, असा होत नाही.
या जोडप्यानं १९८९ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर पतीचे संबंध आपल्याच एका सहकारी महिलसोबत जुळले. यानंतर पत्नी स्वत:ला एकटं समजू लागली आणि त्यातच तीनं १९९६ मध्ये आत्महत्या केली. पतीचं एक्स्ट्रा-मॅरिटल अफेअर इतकं गंभीर स्वरुपाचं नव्हतं की त्यामुळे पत्नीला आत्महत्या करावी लागेल, असं कोर्टासमोर आलं होतं. सोबतच, सामान्यत: महिलेच्या पतीनं कधीही तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारं कोणतं कामही केलं नव्हतं, असंही समोर आलं होतं.

असं जर उघड झालं तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरला बेकायदेशीर आणि अनैतिक करार केलं जाऊ शकतं. परंतु, या प्रकरणात मात्र पतीनं आपल्या पत्नीला आत्महत्या करण्यास भाग पाडलं हे सिद्ध होऊ शकलं नाही, असं स्पष्टीकरण न्यायालयानं दिलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.