wari

‘याचसाठी केला अट्टहास...’

ज्या क्षणांची लाखो वारकरी वाट पाहत होते तो दिवस आज उगवलाय. पंढरपूरच्या सावळ्या विठूरायाच्या दारात उभं राहून साजरं रुप डोळ्यात साठवणं हे एका क्षणात वारीचं सार्थक झाल्यासारखं असतं. त्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झालेत.

Jun 30, 2012, 10:42 AM IST

फड दांम्पत्य ठरले ‘मानाचे वारकरी’

गेल्या अनेक वर्षांपासून राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात येते. शिवाय यावेळी मुख्यमंत्र्यासह पूजेचा मान एका वारकरी दाम्पत्याला मिळतो. यंदा लातूरमधल्या हकनाकवाडीच्या फड दाम्पत्याला मानाचे वारकरी हा मान मिळाला.

Jun 30, 2012, 10:37 AM IST

पालख्या पंढरीच्या उंबरठ्यावर...

सावळ्या विठूरायाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या वारकऱ्यांचा मेळा आता पंढरपुरात दाखल होईल. आज वाखरीचा मुक्काम आटोपून सर्व पालख्या पंढरपूरकडे रवाना होतील.

Jun 29, 2012, 10:44 AM IST

वारकरी विठूरायाच्या भेटीसाठी आतूर

विठूरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी आता पंढरपूरपासून हाकेच्या अंतरावर आहेत.. ज्ञानोबा माऊली आणि सोपानदेवांच्या पालखीची काल भेट झाली.

Jun 28, 2012, 10:38 AM IST

माउलींची पालखी सोलापुरात दाखल

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं फलटणहून विडणी, पिंपरद, निंबळक फाट्यावरून प्रवास करत काल बरडला मुक्काम केला होता. आज माउलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. पालखीचा आजचा मुक्काम नातेपुते इथं असणार आहे.

Jun 24, 2012, 02:55 PM IST

माऊलींची पालखी फलटणमध्ये होणार दाखल

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सातारा जिल्ह्यातील फलटण इथं प्रस्थान करणार आहे.

Jun 22, 2012, 08:27 AM IST

माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण आज

पंढरीच्या वारीमध्ये आज रिंगण सोहळ्यांची पर्वणी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंदवरून पंढरपूरकडे मार्गस्थ झालीय. तरडगावजवळ ‘चांदोबाचा लिंब’ इथं माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण रंगणार आहे.

Jun 21, 2012, 11:43 AM IST

पालखीच्या स्वागतासाठी बारामती - लोणंद सज्ज

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज सातारा जिल्ह्यात पोचणार आहे. साताऱ्यातल्या लोणंदमध्ये पालखी आज रात्री विश्रांती घेईल. तर तुकोबांची पालखी बारामती इथं मुक्कामाला असेल.

Jun 19, 2012, 11:28 AM IST

माऊलींची पालखी जेजुरीकडे मार्गस्थ

माऊलींची पालखी आज सासवडहून जेजुरीकडे मार्गस्थ होतेय. तर संत तुकोबांची पालखी यवतहून वरवंडकडे प्रस्थान ठेवतेय. जेजुरीत माऊलींच्या पालखीचं भंडारा उधळत स्वागत करण्यात येणार आहे.

Jun 17, 2012, 09:45 AM IST

एकात्मतेची वारी

पंढरीची वारी पंढरपूरपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक गावांना काहीतरी देऊन जाते, काहीतरी शिकवून जाते. देहूतून निघालेले तुकोबा दरवर्षी अनगडशहा बाबांच्या दर्ग्यावर पहिला विसावा घेतात आणि वारी हा फक्त धार्मिक सोहळा न राहता, ऐक्याचा सोहळा होऊन जातो.

Jun 12, 2012, 08:20 AM IST

‘...पाहीन श्रीमुख आवडींने’

अमित जोशी, देहू

‘तुका म्हणे माझे हेंचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीने |’... तुकाराम महाराजांच्या याच ओव्यांमध्ये सध्या सगळं देहू रंगलं आहे. जेष्ठ सप्तमी म्हणजे १० जूनला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना होत आहे.

Jun 9, 2012, 08:40 PM IST