कांगारूंना लोळवलं, माही, अश्विन विजयाचे शिल्पकार
ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सने मात करत टीम इंडियानं चन्नई टेस्ट जिंकली. आर. अश्विनच्या 12 विकेट्स आणि धोनीची 224 रन्सची कॅप्टन्स इनिंग भारतीय टीमच्या विजयात निर्णायक ठरली.
Feb 26, 2013, 12:05 PM ISTमनोजची शतकी खेळी, सिलेक्टर संभ्रमात...
भारताचा मधल्या फळीतील फलंदाज मनोज तिवारी शतकी खेळी करून निवड समितीला बुचकळ्यात टाकले आहे. चेन्नईत सुरू असलेल्या भारत “अ” आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात भारताचा फलंदाज मनोज तिवारी याने शानदार खेळी केली.
Feb 19, 2013, 11:57 AM ISTमुंबईत मोनोरेल चाचणी यशस्वी !
मुंबईकरांना प्रतिक्षा असलेल्या मोनोरेलची चाचणी यशस्वी झाली आहे. वडाळा डेपो ते वडाळा आयमॅक्स मार्गावर चाचणी घेण्यात आली. सुमारे दोन किलोमीटरपेक्षा जास्त मार्गावर मोनोरेलची चाचणी घेण्यात आली.यावेळी रेल्वेचे वरीष्ठ तंत्रज्ञ उपस्थित होते.
Feb 18, 2012, 01:13 PM ISTइंडियाची हाराकिरी
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अॅडलेड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पुन्हा बाजी मारली आहे. टीम इंडियाची हाराकीरी दिसून आली. सचिन तेंडुलकर पुन्हा अपयशी ठरला आहे. १३ रन्स करून तंबूत परतला आहे. ५०० रन्सचं आव्हान टीम इंडियाला आता पेलणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पराभवाकडे वाटचाल असल्याचे दिसून येत आहे.
Jan 27, 2012, 03:36 PM ISTटीम इंडियाला पहिला धक्का
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अॅडलेड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव १६७ रन्सवर घोषित केला आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर ५०० रन्सचे टार्गेट आहे.
Jan 27, 2012, 11:30 AM ISTऑस्ट्रेलिया आणि व्दिशतके....
अॅडलेड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टन मायकेल क्लार्क आणि रिकी पॉन्टिंग यांनी नॉट आऊट डबल सेंच्युरी केली आहे. या दोघांची पार्टनरशिप टीम इंडियाला डोकेदुखी ठरली आहे. टीम इंडिया बॅकफूटवर गेली आहे. ओपनर वॉर्नर, कोवन आणि शॉन मार्श या टॉप तीन बॅट्समनला झटपट आऊट करण्यात टीम इंडियाच्या बॉलर्सना यश आलं. मात्र, त्यानंतर यश आलं नाही.
Jan 27, 2012, 08:17 AM ISTविराटचे शतक, इंडिया ऑलआऊट
टीम इंडियाच्या विराट कोहलीने झुंजार शतक फटकावून टीमला नवा सूर दाखवून दिला आहे. कसोटी कारर्कीदीतील विराटचे पहिले शतक आहे. ऑस्ट्रेलियात सचिन, लक्ष्मण, द्रविड, सेहवाग यांच्यासारख्या खेळाडूंनी नांगी टाकली असताना विराट खेळी करून टीम इंडियाची इज्जत राखली आहे.
Jan 26, 2012, 02:57 PM ISTविराटची खेळी, साहा आऊट
विराट कोहली आणि बुध्दीमान साहाने शतकी भागिदरी केली. त्यामुळे टीम इंडियाच्या ६ बाद २२५ रन्स झाल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाने साहाची विकेट घेवून पुन्हा एक जोरदार धक्का दिला.
Jan 26, 2012, 11:33 AM ISTसचिन आऊट, विराटचे अर्धशतक
अॅडलेड टेस्टच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने पुन्हा नांगी टाकली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पुन्हा निराशा केली आहे. तो २५ रन्सवर आऊट झाला. ऑस्ट्रेलियाच्या ६०४ रन्सचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक झाली आहे. १४५ रन्सवर ५ विकेट गेल्या आहेत.
Jan 26, 2012, 10:28 AM ISTऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज शतकवीर तंबूत
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज शतकवीर डेव्हिड वॉर्नरनंची खेळी १८० रन्सवर संपुष्टात आली. ईशान शर्माने उमेश यादवकडे कॅच देण्यास भाग पाडून विकेट पदरात पाडली. ऑस्ट्रेलियाची स्थिती चार बाद २९७ रन्स आहे.
Jan 14, 2012, 04:20 PM ISTऑस्ट्रेलिया ऑलआऊट
पर्थ टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये ३६९ रन्स केले. ऑस्ट्रेलियाचे बॅटमन्स धावांचा डोंगर उभा करणार असे वाटत असताना टीम इंडियाच्या बॉलर्सनी शेवटी कमाल केली. ऑस्ट्रेलियाचे बॅटमन्स झटपट बाद करत त्यांची खेळी ३६९ रन्सवर रोखली.
Jan 14, 2012, 03:47 PM ISTसचिन बाद, टीम इंडियाकडून निराशा
टीम इंडियाकडून पुन्हा निराशा झाली. सचिन तेंडुलकरला ८ रन्सवर संशयास्पद बाद देण्यात आले. खुद्द सचिनने नाराजी व्यक्त केली. ८५ रन्सच्या बदल्यात ४ विकेट टीम इंडियाने गमावल्यात.
Jan 14, 2012, 03:33 PM ISTऑस्ट्रेलियाला दिला दणका
ऑस्ट्रेलियाचे बॅटमन्स धावांचा डोंगर उभा करणार असे वाटत असताना टीम इंडियाच्या बॉलर्सनी शेवटी कमाल केली. ऑस्ट्रेलियाचे बॅटमन्स झटपट बाद केलेत. ऑस्ट्रेलियाची स्थिती ९ विकेट ३६१ रन्स अशी आहे.
Jan 14, 2012, 02:06 PM ISTइंडियाच्या बॉलर्सची धुलाई
पर्थ टेस्टमध्ये पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाला १६१ रन्सवर ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी गारद केलं. त्यानंतर ऑसी बॅट्समनी इंडियाच्या बॉलर्सचा यथेच्छ समाचार घेताना एकही विकेट् न गमावता १६४रन्सचा स्कोअर केला आहे.
Jan 14, 2012, 01:31 PM ISTऑस्ट्रेलियाला चौथा धक्का
पर्थ टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी उमेश यादवने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर टीम इंडियाच्या बॉलर्सनी आणखी दोन विकेट झटपट घेण्यात यश आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या ३ बाद २४२ रन्स झाल्या आहेत.
Jan 14, 2012, 11:25 AM IST