टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अॅडलेड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पुन्हा बाजी मारली आहे. टीम इंडियाची हाराकीरी दिसून आली. सचिन तेंडुलकर पुन्हा अपयशी ठरला आहे. १३ रन्स करून तंबूत परतला आहे. ५०० रन्सचं आव्हान टीम इंडियाला आता पेलणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पराभवाकडे वाटचाल असल्याचे दिसून येत आहे.
मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अॅडलेड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव १६७ रन्सवर घोषित केला आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर ५०० रन्सचे टार्गेट होते. मात्र, पुन्हा फलंदाजी ढेपाळण्यास सुरूवात झाली. पहिला धक्का गौतम गंभीरने दिला. तो ३ रन्स करून परतला. वीरेंद्र सेहवाग ६२ तर द्रविडने २५ रन्स केल्या. टीम इंडियाच्या ११७ वर ४ विकेट गेल्या आहेत.
टीम इंडियाची दुसऱ्या डावातही निराशाजनक सुरूवात झाली आहे. गौतम गंभीर ३ रन्स वर आऊट झाला. २४ रन्सच्या बदल्यात १ विकेट गेली आहे. टीम इंडियातर्फे ईशान शर्माने हसीची विकेट काढली. तर रिकी पॉंटिंगने अर्धशतक करताना ५७ रन्स केल्या आहेत. टेस्ट वाचवण्यासाठी टीम इंडियाच्या बॅट्समनचा चांगलाच कस लागणार. चांगली ओपनिंग करुन देण्यात गंभीर पुन्हा अपयशी ठरत तो फक्त 3 रन्सवर तंबूत परतलाय. आता मिडल ऑर्डरनं संयमी खेळ करत टीम इंडियाची लाज वाचवण्याच आहे. या आधीच्या तिन्ही टेस्ट गमावलेल्या टीम इंडियाला शेवटची टेस्ट वाचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावावं लागणार आहे.
कांगारुंना मोठा स्कोअर उभा करण्यापासून रोखण्यास टीम इंडिसाचे बॉलर्स अपयशी ठरलेत. चौथ्या दिवशी लंच पर्यंत कांगारुंकडे ४८६ रन्सची आघाडी आहे. रिकी पॉन्टिंग चांगल्याच फॉर्मात असून त्यानं आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केलीय. तर दुसरीकडे आर अश्विननं २ , झहीर खान, उमेश यादव आणि ईशांत शर्मानं प्रत्येकी १-१ विकेट घेतलीय. मायकल क्लार्क ३७ रन्सवर आऊट झालाय. तर माईक हसीला १५ रन्सवर ईशांतनं तंबूत पाठवलं.
टीम इंडिया - दुसरा डाव 118/4
ऑस्ट्रेलिया – दुसरा डाव घोषित 167/5
टीम इंडिया - पहिला डाव 272
ऑस्ट्रेलिया – डाव घोषित 604/7