ऑस्ट्रेलिया आणि व्दिशतके....

अॅडलेड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टन मायकेल क्लार्क आणि रिकी पॉन्टिंग यांनी नॉट आऊट डबल सेंच्युरी केली आहे. या दोघांची पार्टनरशिप टीम इंडियाला डोकेदुखी ठरली आहे. टीम इंडिया बॅकफूटवर गेली आहे. ओपनर वॉर्नर, कोवन आणि शॉन मार्श या टॉप तीन बॅट्समनला झटपट आऊट करण्यात टीम इंडियाच्या बॉलर्सना यश आलं. मात्र, त्यानंतर यश आलं नाही.

Updated: Jan 27, 2012, 08:17 AM IST

www.24taas.com, अॅडलेड

अॅडलेड टेस्टमध्ये  ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टन मायकेल क्लार्क आणि रिकी पॉन्टिंग यांनी नॉट आऊट डबल सेंच्युरी केली आहे. या दोघांची पार्टनरशिप टीम इंडियाला डोकेदुखी ठरली आहे. टीम इंडिया बॅकफूटवर गेली आहे. ओपनर वॉर्नर, कोवन आणि शॉन मार्श या टॉप तीन बॅट्समनला झटपट आऊट करण्यात टीम इंडियाच्या बॉलर्सना यश आलं. मात्र, त्यानंतर यश आलं नाही.

मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

क्लार्क आणि माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगनं टीम इंडियाच्या बॉलर्सला कोणतच यश मिळू दिलं नाही. दोघांनी भारतीय बॉलर्सचा यथेच्छ समाचार घेतला. क्लार्क २१० रन्सवर तर पॉन्टिंग १९८ रन्सवर नॉट आऊट आहेत. टीम इंडियाकडून अश्विननं २ तर झहीरनं एक विकेट घेतली. तर क्लार्क आणि पॉन्टिंगनं ३८५ रन्सची पार्टनरशिप केली आहे.

रिकी पॉण्टिंगने पुन्हा एकदा टीम इंडिया विरूद्ध शतक ठोकलं आहे, त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतलं ४१वं शतक ठोकलं आहे. त्याने त्याच्या या संपूर्ण खेळीमध्ये शानदार १२ फोरच्या साह्याने शतकी खेळी केली आहे. तर त्याच सोबत पुन्हा एकदा कॅप्टन्स इनिंग खेळत मायकल क्लार्क याने देखील शतकं काढलं आहे त्याने त्याच्या खेळीत १४ फोर आणि एका षटकाच्या जोरावर शतकं ठोकलं आहे.

पहिल्या दिवशी लचं पर्यंत ऑसींनी आपल्या ३ विकेट गमावल्या होत्या. त्यात दोन विकेट आर. अश्विनने घेतली तर एक विकेट झहीर खानने मिळवली. पर्थ टेस्टमध्ये भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या धडाकेबाज डेव्हिड वॉर्नरचा अडसर झहीर खाननं लगेचच दूर केला. त्यानंतर अश्विननं शॉन मार्शचा काटा काढला. वॉर्नर आणि मार्श झटपट तंबूत तर कोवेननं याला देखील अश्विन लक्ष्मणकरवी झेलबाद करीत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कोवेन परतल्यानंतर पाँटिंग आणि मायकल क्लार्क यांनी  कांगारूंचा डाव सावरला आहे

ऑस्ट्रेलिया –  (दुसरा दिवस)  469/3  

ओव्हर्स 120.0