ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

पर्थ टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये ३६९ रन्स केले. ऑस्ट्रेलियाचे बॅटमन्स धावांचा डोंगर उभा करणार असे वाटत असताना टीम इंडियाच्या बॉलर्सनी शेवटी कमाल केली. ऑस्ट्रेलियाचे बॅटमन्स झटपट बाद करत त्यांची खेळी ३६९ रन्सवर रोखली.

Updated: Jan 14, 2012, 03:47 PM IST

www.24taas.com , पर्थ

 

पर्थ टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये ३६९ रन्स केले. ऑस्ट्रेलियाचे बॅटमन्स धावांचा डोंगर उभा करणार असे वाटत असताना टीम इंडियाच्या बॉलर्सनी शेवटी कमाल केली. ऑस्ट्रेलियाचे बॅटमन्स झटपट बाद करत त्यांची खेळी  ३६९ रन्सवर रोखली. तर टीम इंडियाने बिन बाद १६ रन्स केल्या आहेत. सेहवाग ६ तर ं गंभीर १६ रन्सवर खेळत आहेत.

 

 

मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

 

डेव्हिड वॉर्नरच्या १८० रन्सच्या खेळीमुळेच कांगारुंना ३६९ रन्सपर्यंत मजल मारता आली. तर एड कोवाननं ७४ रन्सची इनिंग खेळली. यामुळेच कांगारुंना टेस्टमध्ये २०० रन्सची महत्त्वपूर्ण आघाडीही घेता आली. कांगारुंच्या मिडल ऑर्डर बॅट्समनना टीम इंडियाच्या फास्ट बॉलर्सनी स्थिरावण्याची संधीच दिली नाही. उमेश यादवनं भारताकडून सर्वाधिक ५  विकेट्स घेतल्या. झहीर खानला दोन विकेट्स घेण्यात यश आलं. तर ईशांत शर्मा, विनय कुमार आणि वीरेंद्र सेहवागनं प्रत्येकी एकेक विकेट घेतली.

 

उमेद यादवने हॅरीसला गौतम गंभीरकडे कॅच देण्यास भाग पाडून नववा धक्का दिला. तर त्या आधी सूर न सापडलेल्या जहीर खानने टीम इंडियाला पाचवी विकेट मिळवून दिली. त्यांने कर्णधार मायकेल क्लार्कला १८ धावांवर रोखले. झहीरच्या बॉलिंगवर क्लार्कची कॅच धोनीने घेतली.  तर धडाकेबाज शतकवीर  डेव्हिड वॉर्नरनंची खेळी १८० रन्सवर संपुष्टात आली. त्याला ईशान शर्माने उमेश यादवकडे कॅच देण्यास भाग पाडून विकेट पदरात पाडली.

 

पहिल्या दिवशी बिनबाद १४९  धावा केल्यानंतर आत्मविश्‍वास दुणावलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर  अंकुश लावण्यात   वेगवान गोलंदाज उमेश यादवला यश आले. त्याने ऑस्ट्रेलियाचे तीन भक्कम फलंदाज बाद करून ऑस्ट्रेलियाची घोडदौड रोखून धरली आहे.  त्यानंतर टीम इंडियाच्या  बॉलर्सनी  आणखी दोन विकेट झटपट घेण्यात यश  मिळविले आहे.

 

 

रिकी पॉंटिंगची ७ रन्सवर खेळीच केली. तो क्लिन बोल्ड झाला. शान मार्शला ११ रन्सवर तर कोवेनंला  क्लिन बोल्ड उमेश यादवने केले.  तिन्हीही विकेट घेत आपल्याला बॉलिंगची चुणूक दाखवून दिली.

 

कोवेनं ७४ रन्स केल्या. मात्र, टीम इंडियाचे फिल्डींग खराब झाली. काही झेलही सोडले. शतकवीर वॉर्नचा  झेल सोडल्याने त्याने त्याचा पुरेपूर फायदा उठवला आहे.