विराटची खेळी, साहा आऊट

विराट कोहली आणि बुध्दीमान साहाने शतकी भागिदरी केली. त्यामुळे टीम इंडियाच्या ६ बाद २२५ रन्स झाल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाने साहाची विकेट घेवून पुन्हा एक जोरदार धक्का दिला.

Updated: Jan 26, 2012, 11:33 AM IST

www.24taas.com, अॅडलेड

 

अॅडलेड टेस्टच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने पुन्हा नांगी टाकली असताना विराट कोहलीने एक बाजू लावून धरली आहे. तो शतकापासून ९ पावले दूर आहे.

 

विराट कोहली  आणि बुध्दीमान साहाने शतकी भागिदरी केली. त्यामुळे टीम इंडियाच्या ६ बाद २२५ रन्स झाल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाने साहाची विकेट घेवून पुन्हा एक जोरदार धक्का दिला.

 

 

मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

 

बुध्दीमान साहा ३५  रन्सवर आऊट झाला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पुन्हा निराशा केली आहे. तो २५ रन्सवर आऊट झाला. ऑस्ट्रेलियाच्या ६०४ रन्सचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक झाली आहे. वीरेंद्र सेहवाग १८, गौतम गंभीर ३४, लक्ष्मण १८ आणि सचिन तेंडुलकर २५ रन्सवर आऊट झालेत.  टीम इंडिया  अजूनही  पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला या मॅचमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.