www.24taas.com, चेन्नई
ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सने मात करत टीम इंडियानं चन्नई टेस्ट जिंकली. आर. अश्विनच्या 12 विकेट्स आणि धोनीची 224 रन्सची कॅप्टन्स इनिंग भारतीय टीमच्या विजयात निर्णायक ठरली. या विजयासह टीम इंडियानं चार टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये 1-0 नं आघाडी घेतली आहे.
चेन्नई टेस्टवर टीम इंडियानं निर्विवाद वर्चस्व गाजवत दणदणीत विजय मिळवला. सांघिक कमगिरीच्या जोरावर भारतीय टीमला या टेस्टमध्ये विजय मिळवणं शक्य झालं. बॉलर्स आणि बॅट्समननी आपल्या जबरदस्त कामगिरीनं कांगारुंवर मात केली. ऑस्ट्रेलियाला दुस-या इनिंगमध्ये 241 रन्सवरच गुंडाळण्यात टीम इंडियाला यश आलं.
यानंतर भारतासमोर केवळ 50 रन्सचं विजयी लक्ष्य होतं. हे आव्हान टीम इंडियानं वीरेंद्र सेहवाग आणि मुरली विजयची विकेट गमावून सहज पार केलं. सचिन तेंडुलकरनं पहिल्या इनिंगप्रमाणे दुस-या इनिंगमध्येही आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवला. त्यानं दोन सिक्स मारत टीम इंडियाचा विजय आणखी सुकर करून दिलं. कॅप्टन महेंद्रसिंग धोनी ख-या अर्थानं टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
त्यानं 224 रन्सची निर्णायक इनिंग खेळत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या याच कॅप्टन्स नॉकमुळे माहीला मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. तर चेन्नई टेस्टमध्ये 12 विकेट्स घेणारा आर. अश्विनही भारताच्या विजयाचा हिरो ठरला. आपल्या होम ग्राऊंडवर त्यानं आपल्या स्पिनच्या जाळ्यात कांगारु बॅट्समनना चांगलचं अडकवलं.
या मॅचमध्ये भारताच्या स्पिनर्सनं ऑस्ट्रेलियाच्या सर्वच्या-सर्व बॅट्समनना आऊट करण्याची किमया साधली. टीम इंडियानं चेन्नई टेस्ट जिंकत ऑस्ट्रेलियात झालेल्या पराभवाचा वचपा काढण्या