म्हणून जयललिता यांना देव मानतात लोकं
७५ दिवस संघर्ष केल्यानंतर वयाच्या ६८ व्या वर्षी जयललिता यांचं निधन झालं. त्या ६ वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. २२ सप्टेंबरला जयललिता यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सोमवारी रात्री ११.३० मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
Dec 6, 2016, 09:21 AM ISTजयललितांचा अभिनेत्री ते मुख्यमंत्री असा धडाकेबाज प्रवास
फिल्मी पडद्यावर झळकलेली एक अभिनेत्री ते थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेली एक लढवय्या राजकारणी असा धडाकेबाज प्रवास जयललितांनी केला. जयललिता यांनी चंदेरी दुनियेतून प्रवास सुरु केला.
Dec 6, 2016, 07:05 AM ISTपनिरसेल्वम यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
तामिळनाडु मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री ओ. पनिरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयललिता यांच्या निधनानंतर मध्यरात्रीच दी़ड वाजता हा शपथविधी पार पडला. यावेळी ओ. पनिरसेल्वम भावूक झाले होते. त्यांच्याबरोबर 31 मंत्र्यांनीही शपथ घेतली. जयललितांवर उपचार सुरु असताना त्यांच्या अनुपस्थिीत त्यांचे विश्वासू सहकारी पनिरसेल्वम हेच सरकारचा कारभार पहात होते.
Dec 6, 2016, 06:50 AM ISTजयललिता यांच्यावर उपचार सुरु, केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रविवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला आहे. चेन्नईतल्या अपोलो रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. अपोलो रुग्णालयातल्या सीसीयूमध्ये त्यांच्यावर अडीच महिन्यांपासून उपचार सुरु आहेत. तज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. त्याचबरोबर लंडनमधील डॉक्टरांचाही सल्ला घेतला जातोय.
Dec 5, 2016, 08:09 AM ISTजयललितांच्या विभागांची जबाबदारी पनीरसेल्वम यांच्याकडे...
जयललितांच्या विभागांची जबाबदारी पनीरसेल्वम यांच्याकडे...
Oct 12, 2016, 03:05 PM ISTजयललितांच्या विभागांची जबाबदारी पनीरसेल्वम यांच्याकडे...
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करून आज वीस दिवस होत आहेत. २२ सप्टेंबरपासून त्या हॉस्पीटलमध्ये भरती आहेत.
Oct 12, 2016, 07:48 AM ISTएनआयएकडून सहा संशयित दहशतवाद्यांना अटक
केरळच्या कोझिकोड आणि कन्नाकमाला जिल्ह्यातून सहा संशयित दहशतवाद्यांना एनआयएने अटक केलीय. हे सर्वजण मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा एनआयएनं म्हटलंय.
Oct 3, 2016, 08:42 AM ISTकर्नाटक - तमिळनाडूच्या वाादावर मंजुलची तिरकी रेघ
कर्नाटक - तमिळनाडूच्या वाादावर मंजुलची तिरकी रेघ
Sep 13, 2016, 01:06 PM ISTकाँग्रेसची दोन राज्य गेलीत, डावे आणि भाजपची मुसंडी तर ममता, जयललिता यांनी गड राखला
पाच राज्यांतमधील निवडणुकीत काँग्रेसने केरळ आणि आसाम गमावले तर केरळ डाव्यांनी आणि आसाम भाजपने आपल्याकडे खेचून आणले. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल एकहाती जिंकले. जयललिता यांनी तामिळनाडूत बाजी मारली तर काँग्रेसने पुडुचेरीत यश संपादन केले.
May 19, 2016, 11:48 PM ISTविजयानंतर अम्माच्या पायावर कार्यकर्त्यांचे लोटांगण
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा जयललितांच्या हाती सत्तेची सूत्रे सोपवलीत.
May 19, 2016, 03:43 PM ISTतामिळनाडूत पुन्हा जयललिता यांना बहुमत
तामिळनाडूत दर पाचवर्षांनी सत्ता बदलण्याचा इतिहास होता, मात्र यावेळी पुन्हा जयललिता यांनी बाजी मारली आहे. जयललिता यांना राज्यात बहुमत मिळाले आहे.
May 19, 2016, 03:22 PM ISTनिवडणुकीच्या मैदानात श्रीसंत क्लीनबोल्ड
क्रिकेटच्या मैदानावर वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना क्लीन बोल्ड करणाऱ्या माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतला मात्र निवडणुकीच्या रिंगणातील पहिल्याच डावात क्लीन बोल्ड व्हावे लागले.
May 19, 2016, 02:18 PM ISTकेरळमध्ये राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी
केरळ विधानसभा निवडणुकीत डावे आघाडी बहुमताच्या वाटेवर आहेत. तर सत्ताधारी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे.
May 19, 2016, 01:19 PM IST