केरळमध्ये राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी

केरळ विधानसभा निवडणुकीत डावे आघाडी बहुमताच्या वाटेवर आहेत. तर सत्ताधारी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. 

Updated: May 19, 2016, 06:03 PM IST
केरळमध्ये राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी title=

तिरुअनंतपुरम : केरळ विधानसभा निवडणुकीत डावे आघाडी बहुमताच्या वाटेवर आहेत. तर सत्ताधारी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. 

काँग्रेसवर या निवडणुकीत डाव्या आघाडीने मात केली असली तर केरळमधील निकालाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार चांगलेच खुश आहेत. केरळमध्ये राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी झालेत. 

कुट्टनाड मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या थॉमस चंडी यांनी विजय मिळवलाय. त्यांनी ४८९१ मतांनी विजय मिळवला. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे जेकब इब्राहिम रिंगणात होते.

तर राष्ट्रवादीचे ए के ससींद्रन यांनी इलथूर मतदारसंघातून २९०५७ मतांनी विजय मिळवला. त्यांनी जनता दल युनायटेडच्या किशन चंद यांना पराभूत केले.